दौंड तालुका दापोडी व केडगाव हद्दीतील भेसळयुक्त गुळ, ५ लाख ३३ हजार ८७०,रु किंमतीचा गुळ जप्त, पुणे अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
By : Polticalface Team ,Sat Oct 01 2022 20:29:09 GMT+0530 (India Standard Time)
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड, ता ०१/१०/२०२२, दौंड तालुक्यातील मौजे दापोडी व केडगाव हद्दीतील गुळ उत्पादकांवर अन्न व औषध प्रशासनाच्या पुणे विभागा मार्फत सतत कारवाई करुनही वारंवार गुळ उत्पादनात साखर/मुदत बाह्यय चॉकलेट वापर होत असल्याची माहिती मिळाल्यावरुन अन्न व औषध प्रशासनातील तीन महिला अधिकाऱ्यांच्या पथकाने दि,३०/०९/२०२२,रोजी मौजे दापोडी व केडगाव तालुका दौंड येथील गुळ उत्पादकांवर कारवाई करुन सुमारे ५ लाख ३३ हजार ८७०/रुपये किंमतीचा भेसळयुक्त गुळ व साखरेचा साठा जप्त केली असल्याची माहिती, पुणे कार्यालय अन्न व औषध प्रशासन विभागाचे प्रमुख सह आयुक्त मा सं,भा,नारागुडे यांनी दिली आहे,
दसरा दिवाळी सणासुदीच्या कालावधीत ग्राहकांची फसवणूक करून कमी दर्जाचे अन्न पदार्थ विक्री होण्याची शक्यता आहे, अशा प्रकारची बाब जनतेच्या निदर्शनास आल्यास त्यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या १८००२२२३६५ टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल असे आश्वासन पुणे विभाग प्रशासनाचे सह आयुक्त मा नारागुडे यांनी दिले आहे,
दौंड तालुक्यातील दापोडी येथील गुळ उत्पादक, गणेश मोहिते, मालक,मे, सचिन गुळ उद्योग, दापोडी ता दौंड,व मे सुपर स्टार गुळ उद्योग, या गुळ उत्पादक चालकांकडून भेसळयुक्त गुळ याचे दोन नमुने व भेसळकारी पदार्थ साखरेचे दोन नमुने घेऊन, उर्वरित १४५८ किलो भेसळयुक्त गुळ याची किंमत रु ५१ हजार ३० रुपये व साखर (अपमिश्रक) १५०० किलो, ५१ हजार रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे, दौंड तालुक्यातील मौजे केडगाव हद्दीतील अमोल मेमाने मालक,मे, समर्थ गुळ उद्योग, केडगाव ता दौंड, यांच्या कडून भेसळ युक्त गुळ एक नमुना व देसळकारी पदार्थ साखरेचा एक नमुना घेऊन उर्वरित १० ९६० किलो भेसळयुक्त गुळ याची किंमत ३ लाख ७२ हजार ६४० रुपये व साखर (अपमिश्रक) १८५० किलो याची किंमत ५९ हजार २०० रुपये किंमतीची साठा जप्त करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले,
दौंड तालुक्यातील याबाबतीत अन्न व औषध प्रशासनास अजुनही मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होत असल्याने प्रशासनामार्फत लवकरच विशेष मोहीम राबवण्यात येणार असून भेसळयुक्त गैरप्रकार आढळून येणाऱ्या गुऱ्हाळ घरांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ अधिकारी यांनी सांगितले, पुणे जिल्ह्यातील सर्व गुऱ्हाळ चालकांनी गुळ उद्योग व्यवसाय कायद्या अंतर्गत आवश्यक असलेला परवाना प्राप्त करून सर्व तरतुदीचे पालन करूनच गुळ उत्पादन करण्याचे आव्हान पुणे अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे,
सदरची कारवाई मा ना, श्री संजय राठोड, मंत्री अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य मुंबई, श्री परिमल सिंह (भा,प्र,से) आयुक्त अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य, यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे कार्यालयातील महिला अधिकारी श्रीमती क्रांती बारवकर श्रीमती शुभांगी कर्ण व श्रीमती अर्चना झांजुर्णे अन्न सुरक्षा अधिकारी, यांनी व रमेश माझीरे वाहन चालक,अविनाश थोरात आणि कंत्राटी नमुना यांच्या सहकार्यांनी घेतली आहे
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.