By : Polticalface Team ,Sat Oct 01 2022 21:08:33 GMT+0530 (India Standard Time)
उस्मानाबाद मध्ये एका सभेत अजित पवार बोलत होते. यावेळी भाषण सुरु असतानाच सभेमध्ये उपस्थित श्रोत्यांमधून एका कार्यकर्त्याने पवारांना चिट्ठी देऊन आपला प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला. पवारांनी आपलं भाषण थांबवलं आणि त्या कार्यकर्त्यांची चिट्ठी घेतली.
यावेळी त्यांनी खास आपल्या शैलीत गाणं गात ती चिट्ठी घेतली. द्या रे असं म्हणत थेट ‘चिट्ठी आयी हैं आयी हैं चिट्ठी आयी हैं’ हे गाणं गायलं. यामुळे श्रोत्यांमध्ये हशा पिकला. पवारांनी ही चिट्ठी वाचून त्या प्रश्नावर मी लक्ष घालतो असं आश्वासन दिलं.
चिट्ठीमधील मजकूर वाचून पवार म्हणाले, “मी या प्रश्नाकडे लक्ष घालतो. मी साखर आयुक्तांशीही बोलतो. हे चुकीचं आहे. राणांचा कारखाना असो किंवा कुणाचाही असो, भाव दिलाच गेला पाहिजे. राणा भाजपात गेले असले तरी आमचं बोलणं बंद आहे असं काही नाही. मी त्यांच्याशीही बोलेन. मी त्यांनाही विचारेल की उसाच्या दराबाबत वस्तुस्थिती काय आहे,” असंही अजित पवारांनी नमूद केलं वाचक क्रमांक :