मानव विकास परिषद कामगार युनियनचे प्रदेशाध्यक्ष यांचा
नाशिक जिल्हा दौरा संपन्न
By : Polticalface Team ,Sat Oct 01 2022 22:41:05 GMT+0530 (India Standard Time)
नाशिक : जिल्ह्यामध्ये देवळा नाशिक शहर वनी या ठिकाणी भेट देऊन पदाधिकाऱ्यांचे संवाद साधला व येणाऱ्या काळामध्ये मानव विकास परिषद घराघरापर्यत गावाच्या कानाकोपऱ्यात खेडोपाडी पर्यंत पोहोचेल याच्यावर सर्व पदाधिकाऱ्यांनी भर द्यावे येणाऱ्या अडचणी कशा पद्धतीने दूर करण्यात येईल याच्यावर लवकरच मेळावा घेण्यात येईल असे सूचना देण्यात आली . संस्थेच्या येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने मानव विकास परिषद संस्था लोकांपर्यंत पोहोचेल याच्यावर जास्त भर द्यावे असे त्यांना सूचना दिल्या देवळा या ठिकाणी तालुका अध्यक्ष राजेंद्र अहिरे. डॉक्टर पंकज देवरे. महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया प्रमुख मोनाली केदारे यांच्याशी संवाद व चर्चा केली कुटे यांनी येणाऱ्या संस्थेच्या कार्यकाळामध्ये प्रत्येकाच्या घराघरापर्यंत मनामनापर्यंत संस्था काम करणार आहे संस्था प्रत्येकाच्या घराघरापर्यंत जाण्यासाठी तयार आहे व त्यांच्या येणाऱ्या अडचणी जाणून घेऊन त्यांचे योग्य ती न्याय देण्यासाठी शासन दरबारी तसेच त्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरण्यास तयार आहे वेळ पडल्यास मानव विकास परिषद संस्थापक मा. अफसर शेख साहेब तसेच वरिष्ठ पदाधिकारी सुद्धा गावोगावी भेट देणार आहेत असे यावेळी त्यांनी सांगितले संदीप कुटे यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे तळमळ पाहून व त्यांची कार्याचे आढावा घेतला यावेळी त्यांच्या आढावा घेताना त्यांच्या लक्षात असे आले की प्रत्येक पदाधिकारी हा चांगल्या पद्धतीने काम करत आहे परंतु यापेक्षा जास्त प्रमाणात काम वाढलं पाहिजे याच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी भर द्यावी असे त्यांचं म्हणणं आहे
वाचक क्रमांक :