By : Polticalface Team ,Sat Oct 01 2022 22:54:46 GMT+0530 (India Standard Time)
राम शिंदे म्हणाले कि, भारतीय घटनेच्या नियमानुसार विधान परिषद सदस्य हा सदस्यातुन निवडून येतो तर लोकांमधून निवडून आलेला विधानसभा सदस्य असतो.त्यामुळे विधानसभा सदस्यांनी राजीनामा दिल्याशिवाय निवडणूक लागत नाही, राजीनामा देऊन चालत नाही असे म्हणत पवारांनी राजीनामा देण्याची मागणीच शिंदे यांनी केली आहे. विधानसभा सदस्यांनी राजीनामा दिला तर मी निवडणुकीला तयार आहे असे म्हणत शिंदे यांनी आमदार रोहित पवारांना खुलं चॅलेंज दिले आहे.
नेमकं काय म्हणाले होते रोहित पवार? आमदार रोहित पवार म्हणाले की, राम शिंदेंनी आजच राजीनामा द्यावा, मी सुद्धा उद्या राजीनामा देतो, प्रचाराला देखील जात नाही आणि जनतेच्या प्रेमावर निवडून येतो, असं थेट आव्हान पवारांनी राम शिंदेंना दिले होते वाचक क्रमांक :