By : Polticalface Team ,Sun Oct 02 2022 10:04:39 GMT+0530 (India Standard Time)
हा पूल पाडण्यासाठी वाहतूक बंद करण्यात आली होती. पुलाच्या स्ट्रक्चरला 1300 छिद्र पाडून त्यात 600 किलो स्फोटक भरली होती. रात्री बारा वाजेनंतर हा परिसर निर्मनुष्य करण्यात आला होता. या परिसरात फार रहिवासी इमारती नाहीत. आजूबाजूला असलेले हॉटेल्स रिकामे करण्यात आले होते.
पुलाचे दगडी आणि सिमेंटचे बांधकाम स्फोटकांमुळे कोसळले आहे. या पुलाच्या बांधकामामध्ये वापरलेले पोलादी स्ट्रक्चर मात्र तसेच आहेत. ज्या-ज्या ठिकाणी स्फोटके लावलेली होती, त्या सर्वच्या सर्व स्फोटकांचा स्फोट झाला नसावा, अशी प्रतिक्रिया देखील अधिकाऱ्यांनी व्यक्त केलीय. सध्या पोकलेनच्या मदतीनं पूल पाडण्याचं काम सुरू असल्यानं वाहतूक उशिरा सुरू होण्याची शक्यता आहे. स्फोटानंतर 50 टक्के पुल कोसळला असून दुसरा ब्लास्ट होणार नाही. त्यामुळे रस्ता रिकामा करण्यासाठी अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे वाचक क्रमांक :