By : Polticalface Team ,Sun Oct 02 2022 20:58:32 GMT+0530 (India Standard Time)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कट रचून मारण्याचा कोणताही प्लॅन नव्हता. दारूच्या नशेत हॉटेल मालकाशी भांडण झाल्याच्या रागातून त्याने हे कृत्य केल्याची माहिती या तरुणाने पोलिसांना दिली.
दरम्यान, मूळचा आटपाडीचा असलेला अजय वाघमारे असं त्याच नाव असून या बातमीने राज्यात एकच खळबळ उडाली होती. या बातमीची राज्यात सर्वत्र एकच चर्चा सुरु होती, माहिती मिळाल्यानंतर सर्व यंत्रणांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील आणि वर्षा बंगल्यावर सुरक्षेत मोठ्या प्रमाणात वाढ केली होती.
दरम्यान, आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून या तरुणांकडून अधिक माहिती घेण्याची प्रक्रिया पोलिसांकडून सुरु आहे वाचक क्रमांक :