पुरंदर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यालयाला भारतीय संविधान भेट देण्याचा संकल्प, मा राज्यमंत्री विजय शिवतारे
By : Polticalface Team ,Mon Oct 03 2022 13:31:09 GMT+0530 (India Standard Time)
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
पुणे :ता ०२/ऑक्टोबर २०२२, रोजी, राष्र्टपिता महात्मा गांधी जयंती दिनाचे औचित्य साधून सिद्धार्थ सामाजिक विकास प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांनी सासवड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे संविधान परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेचे उदघाटन जेष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव व सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब पवार यांनी दीप प्रज्वलन करून केले. यावेळी बोलताना डॉ. आढाव म्हणाले आता प्रत्येक घरातील माणसाला संविधान माहित पाहिजे, आपल्या रोजच्या जीवनाशी संविधान निगडित आहे. त्यामुळे प्रत्येक भारतीयाने घराच्या वर तिरंगा आणि घराच्या आत संविधान ठेवलेच पाहिजे. त्याचा जागर झाला पाहिजे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठान चे अध्यक्ष पंकज धिवार यांनी केले. यावेळी ते म्हणाले मी आंबेडकरी विचारांचा कार्यकर्ता आहे परंतु आज गांधी जयंती च्या दिवशी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्याचे कारण असे आहे की भारतीय राज्यघटना लिहण्या मध्ये डॉ. आंबेडकरांचा सिंहाचा वाटा आहे त्याच बरोबर महात्मा गांधी च्या आग्रही भूमिके मुळे बाबासाहेब त्या संविधान सभेवर जाऊ शकले हे नाकारून चालणार नाही. "या कार्यक्रमावेळी मा. राजमंत्री विजय शिवतारे यांनी पुरंदर तालुक्यातील प्रत्येक ग्रापंचायत कार्यालयात संविधान प्रत देण्याचे,कार्यक्रमाचे आयोजक पंकज धिवार यांना सांगितले, त्यासाठी च्या संविधान प्रति मी स्वतः तुम्हाला देतो असेही ते यावेळी म्हंटले. जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत संविधान प्रत्येक भारतीयाला मार्गदशक राहील.
या परिषदेला संबोधित करताना रिपब्लिकन युवा मोर्चाचे नेते राहुल डंबाळे यांनी असे म्हंटले की "गांधी -आंबेडकर यांचा जयंती सोहळा व त्या निमित्ताने आयोजित केलेली संविधान परिषद हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग आहे. जे संविधानाचे मारेकरी आहेत ते वगळून संविधानाला मानणारे सर्व आपले मित्र आहेत.
या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते जेष्ठ कायदे तज्ञ् असीम सरोदे यांनी महाराष्ट्रात सुरु असलेल्या सध्याच्या राजकीय नाट्यावर कायदेशीर मार्गदर्शन पर मत व्यक्त केलं. सध्याला एकनाथ शिंदे विरुध्द्व लोकशाही अशी लढाई सुरु आहे. न्याय व्यवस्था देखील विकाऊ झालेली आहे त्यामुळे आपण सर्व भारतीयांनी संविधानाचे रक्षण केले पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाच्या कमिटीवर न्यायमूर्ती चंद्रचूड यांची नियुक्ती काही महिन्यात होईल त्यावेळी या राजकीय नाट्यावर पडदा पडून हे सरकार विसर्जित होईल व नव्याने निवडणूक लागेल.
यावेळी योग्य उमेदवारांना मत देऊन विधानभवनात पाठवा. या परिषदेला विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी कर्जत जामखेडचे पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब जाधव यांना महात्मा गांधी गतिमान प्रशासक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संविधानाचे अभ्यासक व समाजवादी विचार सरणीचे युवा कार्यकर्ते श्रीकांत लक्ष्मी शंकर यांना महात्मा गांधी समाज सेवा पुरस्काराने सन्मानित केले त्याच बरोबर उद्योग क्षेत्रांत गरुड भरारी घेतलेले युवा उद्योजक भगवान डीखळे यांना महात्मा गांधी उद्योग रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या परिषदेचे सूत्र संचालन आनंदा जाधव यांनी तर आभार रवी वाघमारे यांनी मानले. संविधान उद्देशिकेचे वाचन ऋना नुबंध संस्थेचे देवा व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले.प्रमुख पाहुणे राहुल गिरमे हे देखील उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संयोजन स्वप्नील कांबळे,अमोल खरात, अतिश गायकवाड, युवराज धिवार, कालिदास उबाळे, अजय धिवार, स्वप्नील घोडके, विकास देशमुख, दामू ढोकणे, नितेश पवार यांनी केले. तर या परिषदेला उपस्थितां मध्ये परवीन पानसरे,सीमा कुंभार, कल्पना जाधव, सुमित गावडे,अनिकेत पटेल, संकेत सोनवणे हे होते.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.