लिंपणगाव येथे रब्बी हंगाम पीकनिहाय तंत्रज्ञान प्रशिक्षण व ज्वारी प्रकल्पातील बियाणे वाटप
By : Polticalface Team ,Mon Oct 03 2022 19:10:57 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा : मौजे लिंपणगाव येथे रब्बी हंगाम पीकनिहाय तंत्रज्ञान प्रशिक्षण व ज्वारी प्रकल्पातील बियाणे वाटप करण्यात आले, महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी कार्यालय श्रीगोंदा यांचे कडून मौजे लिंपणगाव येथे रब्बी हंगाम पीक तंत्रज्ञान याविषयी आज प्रशिक्षण आयोजित करण्यात आले प्रशिक्षणासाठी उपस्थित गावचे उपसरपंच श्री अरविंद कुरुमकर तसेच ग्रामपंचायत सदस्य व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते, प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये तालुका कृषी अधिकारी श्री दीपक सुपेकर यांनी रब्बी हंगामातील पिकांविषयी उपस्थित शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले तसेच कृषी विभागातील विविध योजनांची शेतकरी बांधवांना माहिती सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी सहाय्यक संतोष झेंडे यांनी केले, या कार्यक्रमाला मंडळ कृषी अधिकारी श्रीमती शीतल आरू तसेच कृषी पर्यवेक्षक श्री किसन सांगळे हे उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री नागवडे सर यांनी मानले.
वाचक क्रमांक :