By : Polticalface Team ,
केवळ पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या दुर्लक्षितपणामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी जीवापाड जपलेल्या गोधनाचा अखेर मृत्यू झाला आहे अहमदनगर जिल्ह्यातील लंपी आजाराचा शिरकाव सध्या करमाळा तालुक्यात होत असून या आजारामुळे शेतकरी वर्गात कमालीची घबराट निर्माण झाली आहे या आजाराने तालुक्यातील पश्चिम भागात राजुरी तसेच सावडी या भागात जनावराचा मृत्यू झाल्याने शेतकरी कमालीचा हैराण झाला आहे.
शेतकरी वर्गाने अहोरात्र परिश्रम करून जपलेल्या त्यांच्याच जनावराचा डोळ्या देखत लंपी आजाराने मृत्यू झाल्याने शेतकरी वर्गात मात्र हळहळ व्यक्त होत आहे करमाळा तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखाने ठरले शोभेचे वास्तू करमाळा तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यात कधीही पशुवैद्यकीय अधिकारी हजर नसतात त्यामुळे शेतकऱ्यांना एखादा जनावर आजारी असला तर त्या ठिकाणी तसं संबंधित पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची वाट पहावी लागते संबंधित अधिकारी कधीही नेमून दिलेल्या आपल्या निवासस्थानी हजर राहत नाही संबंधित पशुवैद्यकीय दवाखाने नाममात्रालाच ठरले असून फक्त शोभेचे वास्तू असल्याचे पहावयास मिळत आहे त्यामुळे केवळ पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या दुर्लक्षितपणामुळे व वेळकाढूपणामुळे जनावराच्या मृताच्या संख्या वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात असल्याचे शेतकरी वर्गांमधून बोलली जात आहे वाचक क्रमांक :