यवत स्टेशन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला, जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने, राजमाता अहिल्याबाई होळकर यांची प्रतिमा भेट
By : Polticalface Team ,Mon Oct 03 2022 22:46:29 GMT+0530 (India Standard Time)
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता,०३ ऑक्टोबर २०२२, रोजी यवत रेल्वे स्टेशन येथील जिल्हा परिषद शाळेला दौंड तालुका जिजाऊ ब्रिगेड च्या वतीने प्रजादक्ष राजमाता अहिल्याबाई होळकर यांची प्रतिमा तालुकाध्यक्ष शिवमती सारिका ताई भुजबळ यांच्या हस्ते देण्यात आली, या वेळी यवत पंचक्रोशीतील विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी मान्यवरांनी आवर्जून उपस्थिती दर्शवली होती, या प्रसंगी झोपडपट्टी सुरक्षा दलाचे जिल्हाध्यक्ष मा दत्ता भाऊ डाडर यांनी बोलताना म्हणाले जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गोरगरीब कुटुंबातील मुलं मुली शिक्षण घेत आहेत, विद्येची देवता माता सावित्रीबाई फुले, यांनी पुणे येथील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली, म्हणून देशात अनेक महिलांना विविध ठिकाणी सरकारी नोकरीत वरिष्ठ पदावर आपण पाहत आहोत, पूर्वकाळात महिलांना शिक्षणाची बंदी होती, मात्र क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रेरणेतून सावित्रीबाई फुले यांना प्रथम शिक्षिका म्हणून बहुमान प्राप्त झाला, आणि फातिमा शेख यांना प्रथम प्राध्यापिका म्हणून गौरविण्यात आले, शिवकालीन राज्यात राजे मल्हारराव होळकर यांनी अहिल्याबाई होळकर यांना राज्य कारभाराची प्रथम संधी देऊन इंदोर संस्थान राज्य कारभाराची जबाबदारी सोपविण्यात आली, इंग्रजांविरुद्ध राणी अहिल्याबाई होळकर यांनी अनेक लढाईत येश प्राप्त केले, शेतकऱ्यांच्या व प्रजेच्या हितार्थ विविध प्रकारच्या लाभदायक अधिनियमांची अंमलबजावणी केली, महिलांना नेतृत्वाची संधी उपलब्ध करून देण्यात राजे मल्हारराव होळकर यांनी पहिले पाऊल उचलले होते, असे सांगत या संदर्भात मोलाचे मार्गदर्शन झोपडपट्टी सुरक्षा दलाचे पुणे जिल्हाध्यक्ष दत्ता डाडर यांनी केले, तसेच संभाजी ब्रिगेडचे जिल्हा प्रवक्ते रसूल भाई मुलानी, दौंड तालुका काँग्रेस पार्टीचे अरविंद दोरगे, दौंड तालुका आम आदमी पार्टीचे पोपट लकडे यांनीही मनोगत व्यक्त केले, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महापुरुषांच्या विचारांच धर्मनिरपेक्ष शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली, यवत स्टेशन येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इ ७ वी पर्यंत वर्ग असून मुला मुलींसाठी वेगळे असलेल्या स्वच्छतागृहाची दुरअवस्था असल्याचे दिसून आले, या ठिकाणी अंगणवाडी पासून ते इयत्ता सातवी पर्यंत मुलं मुली शिकत आहेत, ८० ते ९० मुला मुलींचा ऐकून पट आहे, पिण्याच्या पाण्याची गैरसोय दिसुन येते हापसावर पाणी हापसुन घ्यावे लागते असे दिसून येत आहे,
यवत ग्रामपंचायत सदस्य व सरपंच यांनी जिल्हा परिषद च्या माध्यमातून येथील अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करावा असे जिजाऊ ब्रिगेडच्या दौंड तालुकाध्यक्षा मा, सारिका ताई भुजबळ यांनी मागणी केली आहे, या वेळी समता परिषदेचे कार्याध्यक्ष मंगेश भाऊ रायकर, संभाजी ब्रिगेड जिल्हा संघटक भारत भुजबळ, यशवंत ब्रिगेड तालुकाध्यक्ष सतीश तांबे, तसेच
यवत रेल्वे स्टेशन येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापिका सौ जयश्री रायकर, व मा, सौ लता जगताप, शिक्षक अनिल हुबे सर, रामहरी लावंड सर, सौ, संगीता टिळेकर, अंगणवाडी सेविका सौ शितल जाधव, मदतनीस सुरेखाताई फरगडे, मुख्याध्यापिका सौ जयश्री रायकर यांनी शाळेत आलेल्या मान्यवरांचे आभार व्यक्त केले, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थी आणि पालक महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.