By : Polticalface Team ,Mon Oct 03 2022 22:57:27 GMT+0530 (India Standard Time)
रयत शिक्षण संस्थेच्या चेअरमनपदी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असावा, असं ठरलंय, तर यांनी अचानक असा का बदल केला? असा प्रश्न यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला. रयत शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यालयासमोर आज आंदोलन करण्यात आलं. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना खासदार उदयनराजे भोसले यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले.
या संस्थेचा चेअरमन किंवा अध्यक्ष कुठल्याही पक्षाचे सरकार असो, तो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असावा, हे ठरलंय. तर मग नेमकं काय घडलं? की त्यांनी एकदम एवढा सगळा बदल केला? आणि बदल करणारे हे कोण? असा घणाघात त्यांनी केला आहे. तसेच या संस्थेवर जर पवार कुटुंबाची संख्या जास्त असेल तर पवार शिक्षण संस्था असं नाव देऊन टाका, आज इथल्या लोकांच्या वेदना तुम्ही ऐकून घेणार आहात की नाही? असा प्रश्न खासदार उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला वाचक क्रमांक :