भांडगाव हद्दीतील कंपन्यांमध्ये स्थानिक तरुणांना प्रथम प्राधान्य मिळावे, सुप्रियाताई सुळे यांना निवेदन

By : Polticalface Team ,Wed Oct 05 2022 00:39:54 GMT+0530 (India Standard Time)

भांडगाव हद्दीतील कंपन्यांमध्ये स्थानिक तरुणांना  प्रथम प्राधान्य मिळावे, सुप्रियाताई सुळे यांना निवेदन दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता ०४/ऑक्टोबर २०२२, भांडगाव परिसरातील कंपन्यांमध्ये स्थानिक तरुणांना व्यवसाय नोकरीत प्रथम प्राधान्य मिळावे या संदर्भात बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांना युवा तरुणांनी निवेदन देऊन, पोलखोल केली आहे, स्थानिक युवक तरुणांनी व्यवसाय नोकरीसाठी जायचे तरी कुठे, असा सवाल उपस्थित करत, रोजगार व व्यवसायासाठी स्थानिक युवकांना प्रथम प्राधान्य मिळावे अशी महत्त्वपुर्ण मागणी केली आहे, दि ०४ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खासदार सौ सुप्रियाताई सुळे यांचा दौंड तालुका पश्चिम दौऱ्यावर आल्या होत्या यावेळी भांडगाव येथील श्री रोकडोबा नाथ मंदिरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह दौंड तालुका माजी आमदार मा, रमेश आप्पा थोरात, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दौंड तालुका अध्यक्ष अप्पासाहेब पवार, पंचायत समिती उपसभापती नितीन दोरगे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आजी माजी जेष्ठ नेते व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, या वेळी युवा तरुणांनी रोजगार उद्योग व्यवसाय संदर्भात पोटापाण्याचा प्रश्न उपस्थित केला भांडगाव परिसरामध्ये ऐकुन १५ ते २० विविध प्रकारच्या कंपन्या कार्यरत आहेत, त्यामध्ये भांडगाव यवत गावातील स्थानिक युवकांना रोजगार व उद्योग व्यवसायासाठी प्रथम प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी भांडगाव ग्रामपंचायत येथे दोन वर्षापासून वेळोवेळी करण्यात आली असुन सुद्धा स्थानिक नेतेमंडळींनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे, भांडगाव ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी विविध कंपन्यांमध्ये स्थानिक तरुणांना प्रथम रोजगार उद्योग व्यावसायाची संधी उपलब्ध करून देण्या ऐवजी, भांडगाव परिसरातील विविध कंपन्यांमध्ये स्थानिक युवकांना रोजगार व उद्योग व्यवसाय देऊच नये अशी व्यवस्था निर्माण करुन, विविध कंपन्यांना लेखी पत्र देऊन रोजगार उद्योग व्यवसाय पासून वंचित ठेवण्याचे काम केले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आली आहे, त्यामुळे भांडगाव यवत परिसरातील युवा तरुणांना मनस्ताप सहन करावा लागत आहे, भांडगाव यवत परिसरातील युवा तरुणांना उद्योग व्यवसायापासून वंचित ठेवण्याचा फटका दौंड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बसल्याशिवाय राहणार नाही अशी प्रतिक्रिया युवा तरुणांनी दिली आहे.
दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेते मंडळींनी या विविध कंपन्यांवर मक्तेदारी स्थापित केली आहे, यांच्या राजकीय दबावाखाली विविध कंपनीमध्ये स्थानिक युवकांना रोजगार उद्योग व्यावसाय करण्याची परवानगी घेतल्या शिवाय कोणालाही व कोणत्याही कंपनीमध्ये काम मिळत नाही, असे स्थानिक युवक तरुणांमध्ये चर्चा केली जात असुन खलबतं होत आहेत, भांडगाव यवत परिसरामध्ये अनेक होतकरू तरुण युवक आहेत यांना रोजगार उद्योग व्यावसायाची संधी उपलब्ध झाल्यास युवा तरुण स्वतःच्या पायावर उभा राहतील, अशी भावना व्यक्त केली जात आहे, मात्र राजकीय नेतेमंडळी फक्त लोकांच्यात देखावा करून मोठ्या मनाने सांगतात युवक तरुणांनी स्वतःच्या पायावर उभे राहावे, अशी अपेक्षा व्यक्त करतात हे योग्य नाही, भांडगाव यवत गावातील तरुणांची दिशाभूल करून मस्करी करत आहेत, या विषया संदर्भात योग्य वेळी परीणाम झाल्याशिवाय राहणार नाही, स्थानिक युवकांना कंपन्यांमध्ये रोजगार उद्योग व्यवसायात प्रथम प्राधान्य द्यावे,अशी मागणी करण्यात आली आहे,
बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी भांडगाव यवत परिसरातील स्थानिक तरुण युवकांना कंपन्यांमध्ये रोजगार उद्योग व्यवसायात प्रथम प्राधान्य मिळावे अशी मागणी करण्यात आली आहे या वेळी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी दौंड तालुका अध्यक्ष अप्पासाहेब पवार तसेच संबंधित राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व पदाधिकारी कार्यकर्ते यांना तत्काळ सूचना करून, स्थानिक युवा तरुणांना कंपन्यांमध्ये प्रथम प्राधान्य मिळालेच पाहिजे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे, यावेळी भांडगाव यवत परिसरातील युवक तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते, महेंद्र दोरगे, आकाश दोरगे, संतोष दोरगे, अक्षय दोरगे, दत्तात्रेय दोरगे, अतुल दोरगे, चंद्रकांत दोरगे, संदीप दोरगे, धीरज गायकवाड, बंटी दोरगे, गणेश फरतडे, चैतन दोरगे, काशिनाथ महानवर, आशिष दोरगे, अक्षय दोरगे, विठ्ठल दोरगे, बबन दोरगे, भांडगाव यवत परिसरातील युवा उद्योजकांनी निवेदनावर स्वाक्षरी केली असून रोजगार व व्यावसायिक उपलब्ध होण्याच्या प्रतीक्षेत आहेत,

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.

शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा

श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.

श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका

श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार

विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे

सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता

श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद