दौंड तालुक्यात खासदार सुळे यांचा दौरा, अजित दादांना मुख्यमंत्री करा, याहून मोठं पॅकेज देऊ, सुप्रियाताई सुळे

By : Polticalface Team ,Wed Oct 05 2022 01:47:41 GMT+0530 (India Standard Time)

दौंड तालुक्यात खासदार सुळे यांचा दौरा, अजित दादांना मुख्यमंत्री करा, याहून मोठं पॅकेज देऊ, सुप्रियाताई सुळे दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता ०४ ऑक्टोबर २०२२, रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संसद रत्न बारामती लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा सौ सुप्रियाताई सुळे यांचा दौंड तालुक्यात दौरा, यवत येथील श्री काळभैरवनाथ मंदिरात ग्रामस्थांशी संवाद साधला, यवत पंचक्रोशीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यवत ग्रामस्थांनी बारामती लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुप्रियाताई सुळे व दौंड तालुका माजी आमदार रमेश आप्पा थोरात,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष, आप्पासाहेब पवार, जिल्हा परिषद सदस्य वीरधवल बाबा जगदाळे, वैशालीताई नागवडे, व इतर मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला, राज्यात चाललेल्या सत्तेच्या राजकारणात मोठी कलाटणी निर्माण झाली असून आघाडी सरकारला पायउतार होण्याची वेळ निर्माण झाली, राज्यातील जनतेने शिवसेना-भाजप युतीला बहुमत दिले होते, मात्र मुख्यमंत्री पदाच्या जागेवरुन युतीत बिघाडी झाली, पहाटेच्या वेळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचा शपथविधीचा कार्यक्रम पार पडला, याचा लोकांना अजुनही विसर पडला नाही, यावर राज्यात अनेक घडामोडी घडल्या याचाही विसर नागरिकांना पडला नाही तोवरच पाठोपाठ अनेक घटना घडल्या आहेत, भाजप नेत्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील आढावा घेतला, आणि केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांच्याकडे बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवली असल्याने त्यांनी दि २२/२३/२४/ या प्रसंगी मुळशी, हवेली, पुरंदर, दौंड, इंदापूर, बारामती तालुक्यात दौरा केला होता, याच पार्श्वभूमीवर राज्यात व तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये या चर्चेला उधाण आले आहे, बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रियाताई सुळे दौंड तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत यवत येथे राज्य सरकार विरुद्ध बोलताना सांगितले, (शिंदे फडणवीस) व केंद्र शासनाच्या गालथान कारभारा संदर्भात बोलताना गॅस सिलेंडरचा आवर्जून उल्लेख करत ठिक ठिकाणी भाजप विरुद्ध कार्यक्रम चालू केलाय, असे सांगत पॉस्कॉन कंपनीत पुणे जिल्ह्यातील दिड लाख तरुणांना नोकऱ्या येणार होत्या, त्या गुजरात राज्यात गेल्या, मुख्यमंत्री असे म्हणाले त्यांचे प्रधानमंत्र्यांशी बोलणं झालेय ?
प्रधानमंत्री म्हणाले, यापेक्षा दुसरं काहीतरी चांगलं देतो, ही कंपनी गुजरातला जाऊद्या, इतका पोरखळपणा या सरकारचा चालू आहे,
मी मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव दिला, तुम्ही दादांना मुख्यमंत्री करा, याहून मोठं पॅकेज देऊ, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केली आहे, तसेच पन्नास खोके सरकार म्हटल्यावर काहीच प्रतिक्रिया दिली जात नाही याचा अर्थ काय समजायचं ऐखाद्यावर खोटा आरोप होतोय तर मग प्रति विरोधी न बोलता गंप का, ? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खासदार सुप्रियाताई सुळे यांनी उपस्थित केला आहे, या वेळी दौंड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष आप्पासाहेब पवार, दौंड तालुका माजी आमदार रमेश थोरात, जिल्हा परिषद सदस्य विरधवल जगदाळे, वैशाली ताई नागवडे, राणीताई शेळके, यवत ग्रामपंचायत विद्यमान सदस्य माजी उपसरपंच सदानंद दोरगे, जि प, सदस्य गणेश कदम, पंचायत समिती माजी सदस्य कुंडलीक खुटवड, उत्तम आबा ताकवणे, दिलीप यादव, दत्तात्रय दोरगे, विष्णू कुदळे,पिंटुशेठ कुदळे अशोक दोरगे, मंगेश रायकर, दत्ता डाडर, तसेच दौंड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, या वेळी दौंड तालुका माजी आमदार रमेश थोरात बोलताना म्हणाले येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती नगरपालिका निवडणुकीत आपल्याला पवार साहेब,अजित दादा व खाजदार सुप्रियाताई सुळे यांना साथ द्यायची आहे, राज्याचे विरोधी पक्ष नेते मा अजित दादा पवार याची पारगाव येथे सभा होणार आहे, राज्यात काय भानगडी चालल्या आहेत ? राज्यातील तरुणांना रोजगारा पासुन दुर ठेवले आहे, दौंड तालुक्यात जवळजवळ साडेतीन वर्षा नंतर अजित दादांची सभा होणार आहे,आपली उपस्थिती असावी, असे माजी आमदार रमेश थोरात यांनी सांगितले, दौंड तालुक्यातील पंच्छिम भागाचा दौरा मौजे पडवी, देऊळगाव गाडा, खोर, भांडगाव, यवत, कासुर्डी, भरतगाव, ताम्हणवाडी, बोरीऐंदी, या भागातील विविध ठिकाणी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भेटी घेतल्या या वेळी यवत येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पारगाव सासवड रा, मा, ११९ यवत येथिल रेल्वे अंडर ब्रिज होणे बाबत निवेदन देण्यात आले, हा ब्रिज झाल्यास या भागातील ग्रामीण गावांना चालना मिळेल,यवत हे मोठ्या संख्येचे गाव असून परीसरातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे, येणे जाण्यासाठी रेल्वे खालील पुल अतीशय धोकादायक व अरुंद आहे, परीसरातील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे, हा राज्य मार्ग असुन दौंड शिरुर पुरंदर या तालुक्याना जोडणारा असुन मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे, असे निवेदनात नमूद केले आहे, या निवेदनात रोहन दोरगे, सागर खुटवड,अमित कुदळे, सागर दोरगे, सचिन महारनोर, अण्णा दोरगे स्वप्निल दोरगे,आबासाहेब दोरगे,विकास दोरगे, यांच्या स्वाक्षरी करुन निवेदन देण्यात आले आहे,

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.

शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा

श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.

श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका

श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार

विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे

सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता

श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद