दौंड तालुक्यातील लडकतवाडी येथे बिबट्याचा मृत्यू, शिकारी जाळ्यात अडकून जीव गेल्याची खळबळजनक घटना, अज्ञात शिकारी बेपत्ता
By : Polticalface Team ,Thu Oct 06 2022 10:46:25 GMT+0530 (India Standard Time)
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता ०५ ऑक्टोबर २०२२, दौंड तालुक्यातील मौजे लडकतवाडी गावाच्या बाजुला काटेरी झाडी झुडपात, ऊसाच्या बांधावर अज्ञात शिकारी इसमाने लोखंडी साखळी जोडलेला पंजा ठोकुन ठेवल्याने त्यामध्ये बिबट्याच्या पायाचा पंजा अडकुन तडफडून नर जातीच्या बिबट्याचा मृत्यू झाल्याची खळबळ जनक घटना घडली, अज्ञात शिकारी बेपत्ता,? तर वनसंरक्षक विभाग अधिकारी यांची धांदल उडाली आहे, या अडचणीच्या परिसरात सरासी काटेरी दाट झाडं झुडपात शेतकरी नागरिकांची वर्दळ व जाणे येणे दुर्मिळ असल्याचे बोलले जात आहे, मात्र या ठिकाणी बिबट्या मृत्यू झाल्याची खबर, गोपाळक राजस्थानी लोकांनी गावातील ग्रामस्थांना दिली, क्षणात ही खबर गावभर पसरली, लडकतवाडी गावातील नागरिकांनी परस्पर एकमेकांना संपर्क साधला हि खबर यवत येथील पत्रकार अनिल गायकवाड यांना मिळतात त्यांनी दौंड वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती कल्याणी गोडसे, यांना संपर्क साधुन सदर घटनेची खबर दिली, दौंड वनपरिक्षेत्र विभाग अधिकारी यांनी तत्काळ यवत येथील वनपाल सचिन पुरी यांना संपर्क साधून लडकतवाडी या ठिकाणी त्वरित पाठवून सत्यता परताळून घेतली, व पुणे सहाय्यक वनसंरक्षक मा दिपक पवार याना मौजे लडकत वाडी गावाशेजारी बिबट्या मृत झाल्याची खबर दिली, काही क्षणात वनसंरक्षक पदाधिकारी व त्यांचे पथक तत्काळ घटनास्थळी उपस्थित झाले, झाडा झुडपातून उसाच्या बांधावर पोचले,असता उसाच्या बांधावर कोणीतरी अज्ञात शिकारी इसमाने पाय अडकण्याचा ट्रॅप लावल्याने व त्यामध्ये बिबट्याचा पाय अडकल्याने तरफडून तरफडून बिबट्याचा मृत्यू झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले,वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी, राहू येथील सरकारी पशुधन विकास एल डी ओ,अधिकारी, अनिल इंगवले, यांना मृत पडलेल्या बिबट्याचा शेव विच्छेदन करण्यासाठी संपर्क साधला, काही वेळात पशुधन विकास अधिकारी आले त्यांनी मृत बिबट्याचा शेव विच्छेदन करताना सांगितले नर बिबट्याचा शेव सडल्याने व आळ्या पडल्याने सर्व बॉडीचे अवयव निकामी झाले आहेत दुर्गंधी परिसरात जोमाने वाहत असल्याचे जाणवत होते, या अंदाजाने आठ दिवसापूर्वी ही घटना घडली असावी असा अंदाज दर्शवण्यात आला, पुणे सहाय्यक वनसंरक्षक मा दीपक पवार व त्यांचे वनपरिक्षेत्र दौंड पथक यांनी आजूबाजूच्या परिसरात बिबट्या वावरल्याचे पाऊलखुणा पाहून, सदर घटनेचा तपास करीत शेतकरी शशिकांत जनार्दन लडकत, यांच्याशी विचारपूस केली, असता या परिसरात राजस्थानी गोपालक (गाई) चारण्यासाठी गेले होते, त्यांनी हि खबर लडकतवाडी गावातील शेतकरी शांताराम बधे व अविनाश बोराटे यांना सांगितली व या बाबत गावभर खबर पसरली असे यांनी सांगितले, या वेळी लडकतवाडी ग्रामपंचायत सरपंच सौ. रागिणी जगताप , गाव पोलीस पाटील राजेंद्र जगताप, व गावातील अनेक शेतकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने मृत बिबट्या पाहण्यास उपस्थित होते, उंडवडी लडकतवाडी परिसरात गेली अनेक महिन्यापासून बिबट्याने धुमाकूळ घातला होता, परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे शेळ्या मेंढ्या जनावरे हल्ला करून जीव मारले आहेत, त्यामुळे या परिसरातील शेतकरी वर्ग भयभीत झाला होता, बिबट्या मृत पावल्याचे समजताच गावातील नागरिकांची गर्दी वाढत चालली होती, या भागातील शेतकऱ्यांनी वेळोवेळी दौंड वनपरिक्षेत्र विभाग प्रमुख अधिकारी यांना कळवले खबर देऊन
भटकत्या जनावराला बंदीस्त करण्याची विनवणी केली होती मात्र दौंड वनपरिक्षेत्र विभागाच्या अधिकाऱ्यांनी जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले, त्या वेळी वनपरिक्षेत्र विभागाकडे बिबट्याला पकडण्यासाठी कोणतेही साहित्य व पिंजरा उपलब्ध नसल्याचे त्यांच्या कडुन सांगण्यात आले होते, असे उंडवडी लडकतवाडी परिसरातील शेतकरी बांधवांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे, त्यावेळी दुर्लक्ष केले नसते तर कदाचित मृत्यू झालेला बिबट्या जिवंत राहिला असता,? अशीही प्रतिक्रिया उंडवडी लडकतवाडी परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे,या परीसरात बिबट्या मोकाट सुटल्याने व दौंड वनपरिक्षेत्र विभाग दुर्लक्ष करीत असल्याने उंडवडी लडकतवाडी परिसरातील नागरिकांनी दौंड तालुका आमदार राहुल कुल यांची भेट घेऊन सदर बिबट्याचा बंदोबस्त करण्याची विनंती केली असल्याने त्या वेळी आमदार राहुल कुल यांनी दौंड वनपरिक्षेत्र विभागीय अधिकारी यांना संपर्क साधून सदर बिबट्याचा बंदोबस्त करण्याची सूचना केली होती, मात्र वनपरिक्षेत्र विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू झाली आहे, (भाजप) शिंदे फडणवीस सरकार देशात बिबट्यांचा तुटवडा असल्याने इतर राज्यातून बिबट्याची आवक करत आहेत, मात्र या ठिकाणी असलेल्या बिबट्यांचा अंत होत चालला आहे, याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होत आहे, उंडवडी लडकतवाडी परिसरात बिबट्याने आज पर्यंत मनुष्य जातीवर प्रहार केला नाही,मात्र पोटभरण्यासाठी शेळ्या मेंढ्या व रान डुक्कर मारल्याची घटना समोर आल्या आहेत, यांचे अनेक वृत्तपत्रांमध्ये व सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या प्रसिद्ध झाले आहेत, बिबट्याच्या भीतीने या परिसरातील नागरिक रात्रीच्या वेळी शेतामध्ये शेतकरी जाण्याचे टाळाटाळ करीत होते कदाचित मनुष्य प्राण्यावर बिबट्याचा हल्ला होण्याची शक्यता नाकरता येत नसावी,या भितीने उंडवडी लडकत वाडी परिसरातील शेतकऱ्यांची कुजबुज चर्चा होत असे,आज दि ०५ ऑक्टोबर रोजी बिबट्या मृत झाल्याची माहिती मिळताच बिबट्या पाहण्यासाठी गर्दी झाली होती,
(अखेर बिबट्या मेल्यावर) पुणे वनसंरक्षक सहाय्यक अधिकारी व वनपरीक्षेत्र अधिकारी दौंड यांचे पथक खळबळून जागे झाले आहे, हिच दक्षता या पूर्वीच दाखवली असती तर कदाचित एका बिबट्याचा जीव गेला नसता,? अशी प्रतिक्रिया उंडवडी लडकतवाडी परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहेत, पुणे विभाग वनसंरक्षण सहाय्यक मा दीपक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती कल्याणी गोडसे,यांच्या पथकातील वनपाल सचिन पुरी यवत, वनरक्षक नानासाहेब चव्हाण पिंपळगाव, वनरक्षक श्रीमती सुनिता शिरसाट वाळकी, वन मजूर रमेश कोळेकर विलास होले सुरेश पवार नौशाद शेख, या वेळी घटनास्थळी प्रामुख्याने उपस्थित होते, पुणे वनसंरक्षक सहाय्यक मा दीपक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मृत पावलेल्या बिबट्याचे शेव फोर व्हीलर टेम्पो गाडीत घालून पिंपळगाव येथील वनक्षेत्रामध्ये दहन विल्हेवाट करणार असल्याचे सांगण्यात आले, तसेच पुढील तपास सुरू असल्याचे सहाय्यक वनसंरक्षक मा दीपक पवार यांनी सांगितले,
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.