यवत गावातील सार्वजनिक धार्मिक परंपरेला, महामार्गावरील लोखंडी ब्रॅकेटचा अडथळा, नागरिकांकडून उड्डाण पुलाची मागणी
By : Polticalface Team ,Thu Oct 06 2022 10:47:45 GMT+0530 (India Standard Time)
दौंड, प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड, ता,०५ ऑक्टोबर २०२२, दौंड तालुक्यातील मौजे यवत ता दौंड जिल्हा पुणे, महामार्गावरील लोखंडी ब्रॅकेटमुळे सार्वजनिक धार्मिक कार्यक्रमाला अडथळा निर्माण होत आहे, त्यामुळे यवत ग्रामस्थांकडून या ठिकाणी उड्डाण पूलाची मागणी केली जात आहे, यवत गावातील कुल दैवत श्री काळभैरवनाथाची पालखी सोहळा पुर्वी पासुन हजरत बडेशाहवली बाबा दर्गा येथे गावातील ग्रामस्थ विजया दशमी दसरा महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो, मात्र काही वर्षापासून पुणे सोलापूर महामार्गाच्या आजूबाजूला लोखंडी ब्रॅकेट लावल्याने श्री काळभैरवनाथाची पालखी सोहळ्याचे नेण्यास अडथळा निर्माण होत आहे,लोखंडी ब्रॅकेट वरून उड्या मारत जावे लागत आहे,? गाव प्रदक्षिणा करीत असताना, हजरत बडेशाहवली बाबा दर्गा येथे पारंपारिक पूर्वीपासून चालत आलेली परंपरा दसऱ्याच्या दिवशी सोने लुटण्याचा कार्यक्रम या ठिकाणी करण्यात येतो नाथ साहेबांचा चांगभले या गजरात पालखी प्रदक्षिणा केली जाते, या प्रसंगी हिंदू मुस्लिम ऐकोपा जपण्याची पूर्वजांनी घातलेली सांगड आजही अबादीत ठेवून जोपासण्याचे कार्य यवत गावातील ग्रामस्थ नागरिक मोठ्या उत्सुकतेने पार करीत आहेत, यवत गावातील ग्रामस्थ नागरिक एकत्रित येऊन दसऱ्याच्या दिवशी श्री काळ भैरवनाथाच्या मंदिरा पासुन ठिक ठिकाणी असलेल्या मंदिरात गावातील ग्रामस्थ नागरिक एकत्रित येऊन पालखीची मिरवणूक काढण्यात येते देव दर्शन करीत पुन्हा श्री काळ भैरवनाथाच्या मंदिरात येऊन प्रत्येक नागरिक एकमेकांना (आपटा रुक्षाचे व हृदय आकाराचे पान देऊन) आपसात जिव्हाळा निर्माण करण्याची महत्त्वाची भूमिका बजावत सोनं देऊन आनंद व्यक्त करताना दिसुन येते, अशा प्रकारे यवत गावचा दसरा महोत्सव साजरा करण्यात येतो, यवत गावचे कुलदैवत श्री काळभैरवनाथाची पालखी गावकरी व मानकरी एकत्रित सर्वांना घेऊन गोंधळी पथकाच्या संबळ ताशा वादक वाद्यात दोन घोड्यासह पालखीत फटाक्यांची आतिष बाजी करण्यात येते तसेच अखेर संध्याकाळी मानकरी गावकरी यांच्या घरी देव विराजमान केले जातात, श्री काळभैरव नाथ साहेबांचा चांगभले, या
यवत गावातील सार्वजनिक धार्मिक परंपरेला पुणे सोलापूर महामार्गा लगद असलेल्या लोखंडी ब्रॅकेट मुळे धार्मिक कार्यक्रमाला अडथळा निर्माण होत असल्याने या ठिकाणी उड्डाणपूल असणे अति आवश्यक असल्याचे गावातील ग्रामस्थ व नागरिकांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे, तसेच श्री काळभैरवनाथ ट्रस्टच्या वतीने पालखी सोहळा गाव प्रदक्षिणा वेळी यवत पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी महालक्ष्मी मंदिर येथे उपस्थिती दर्शवली होती, मात्र महत्वाच्या ठिकाणी पुणे सोलापूर महामार्गावर वाहनांची वर्ग जास्त असते त्या ठिकाणी एक ही पोलीस कर्मचारी वर्ग उपस्थित नव्हते,याची दखल वरीष्ठ पोलिस अधिकारी घ्यावी अशी प्रतिक्रिया देवस्थान ट्रस्टच्या समितीने व्यक्त केली, या वेळी गावातील प्रमुख मान्यवर पदाधिकारी व समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते,
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.
शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा
श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.
श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका
श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर
वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार
विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे
सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता
श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न
अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात
दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील
महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.
दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.
सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन
अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद