धर्माच्या नावाने भीक मागणं सोडा. विकासाच्या अजेंड्यावर मत मागा- डॉ. जितीन वंजारे

By : Polticalface Team ,Fri Oct 07 2022 19:43:59 GMT+0530 (India Standard Time)

धर्माच्या नावाने भीक मागणं सोडा. विकासाच्या अजेंड्यावर मत मागा- डॉ. जितीन वंजारे lबीड प्रतिनीधी:- नुकतेच दसरा मेळावे पार पडले, जितके पक्ष तितके मिळावे विविध ठिकाणी विविध ग्राउंड वर विविध नेत्याचे दसरा मेळावे पार पडले. दसरा मेळावे फक्त धर्माच्या नावाखाली राजकीय पोळी भाजण्याच्या दृष्टिकोनातून साजरे केले जातात की काय ? असा प्रश्न मनामध्ये आला. दसरा मेळाव्यामध्ये जुन्याकाळी आपल्या कार्यकर्त्यांना एक विचारांची ठेव भक्कम वारसा आणि पुढच्या वर्षी पर्यंत प्रेरणा स्रोत आणि ऊर्जा स्रोत देणारे विचार आपल्या नेत्यांनी जनतेला, महाराष्ट्राला आणि कार्यकर्त्यांना देण्यासाठी दसरा मेळाव्याचे आयोजन केले जात असे परंतु हल्लीच्या काळामध्ये दसरा मेळाव्याला धार्मिक आणि राजकीय रूप आणून त्याचा पूर्णपणे राजकारणासाठी उपयोग केला जात असल्याची खंत सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर जितीन वंजारे खालापूरीकर यांनी व्यक्त केली.

आज कालच्या आजी-माजी नेत्यांच्या विविध दसरा मेळाव्याची टेलिव्हिजनवर पाहताना हिंदुत्व या शब्दाच्या पलीकडे त्यांना काही दिसते की नाही का हिंदुत्व हीच त्यांची परिभाषा आहे किंवा हिंदुत्वाच्या नावावरतीच राजकारण करायच आहे असा जणू त्यांनी शड्डू ठोकला आहे अशी परिस्थिती आज कालच्या राजकारणाची झालेली आहे.माझे हिंदुत्व श्रेष्ठ, त्याच हिंदुत्व कनिष्ठ, खालच्या थराचे.हेच गलबला करून सांगून धार्मिकतेवर मत मागायची आणि भावनिक राजकारण करायचं.स्वतःच्या स्वार्थी राजकारणासाठी आणि स्वतःच्या लाभासाठी वाटेल ते हिंदुत्व स्वीकार करून महाराष्ट्राच्या हिताच्या प्रश्नावरती बोलण्याऐवजी धर्मांधाची गोळी देऊन महाराष्ट्राची जनता,कार्यकर्ते गुंगीत ठेवण्याचे काम आजकालची राजकारणी करताना दिसत आहेत दसरा मेळावा हे प्रेरणादायी असतात याच्यातून नवचैतन आणि नव प्रेरणा घेऊन कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागायला पाहिजे त्यात योग्य मार्गदर्शन मिळाला पाहिजे कार्यकर्त्यांच्या समस्येचा निरसन झालं पाहिजे,शेतकरी,कष्टकरी दुर्लक्षित घटकांचे प्रश्न त्या सभेमधून संबंध महाराष्ट्राला कळाले पाहिजे या भावनेतून दसरा मेळावे घेण्याची नितांत गरज आहे आता इथून पुढे विकासाच्या अजेंड्यावर दसरा मेळावे झाले पाहिजेत त्यात त्यानी मी हे हे चांगले काम केली, हे हे अजूनही करणार आहे याचं विश्लेषण व्याव अशी आशा यावेळी सामजिक कार्यकर्ते डॉक्टर जितीन दादा वंजारे खालापूरीकर यांनी व्यक्त केली.परंतु कोन्या एका धर्माला, समुदायाला समोर ठेवून धर्माच्या नावावरती मताची भीक मागणाऱ्या धर्माच्या ठेकेदारांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे.हिंदुत्व ज्यांच-त्याचं पर्सनल असू शकतो तर त्यांनी ते त्यांच्या पुरत सिमीत ठेवावं ते कोणालाही शिकवता कामा नये किंवा त्याचे विचार इतरांवर बळजबरी लादू नयेत कारण व्यक्तीला मनसोक्त स्वच्छंदी आहे असे जगण्याचा आणि वागण्याचा संविधानात्मक मालकी अधिकार आहे कोणी कसं जगायचं हे कोणी कोणाला शिकवायचं नाही महाराष्ट्रामध्ये संविधानिक पदावर असणारे लोक सुद्धा एका विशिष्ट धर्माचे टमकी वाजवताना दिसतात संविधानाच्या कायद्याची पायमल्ली करून अंधश्रद्धा पसरवणारे खेळ खेळतात ज्या गोष्टीवर आपण विश्वास टाकू शकत नाही. ज्या गोष्टी ला वैज्ञानिक बेस नाही अशा गोष्टी हे सर्रासपने करतात.काल झालेले दसरा मेळावा केवळ स्वतःची टीआरपी वाढवणे. माझे हिंदुत्व कसे श्रेष्ठ आहे याचा अनुभव देवून लोकांना गुमराह करुन कार्यकर्त्यांना धर्माच्या गुंगीच औषध देउन शांत बसवणे इतकचं चालू आहे .

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.