नॅशनल हायवे 548 डी या रस्त्यावरील पाणी शेतात व घरामध्ये जात असल्याच्या कारणास्तव लिंपणगाव सह अन्य गावातील शेतकऱ्यांचे तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण

By : Polticalface Team ,Fri Oct 07 2022 21:07:03 GMT+0530 (India Standard Time)

नॅशनल हायवे 548 डी या रस्त्यावरील पाणी शेतात व घरामध्ये जात असल्याच्या कारणास्तव लिंपणगाव सह अन्य गावातील शेतकऱ्यांचे तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण लिंपणगाव( प्रतिनिधी) श्रीगोंदा तालुक्यातील मौजे लिंपणगाव, होलेवाडी तसेच शेंडगेवाडी श्रीगोंदा या ठिकाणी नॅशनल हायवे एन. एच. ५४८ डी या रस्त्याच्या लगत शेतामध्ये व घरामध्ये जे पावसाचे पाणी जाते, त्याची अद्याप पर्यंत उपाययोजना झालेली नाहीत यासाठी वरील शेतकऱ्यांनी श्रीगोंदा येथील तहसील कार्यालया समोर आमरण उपोषण सुरू केले आहे. श्रीगोंद्याचे तहसीलदार व संबंधितांना दिलेल्या निवेदनात अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी पुढे म्हटले आहे की ,आम्ही वरील ठिकाणचे रहिवासी असून, वरील विषयासंदर्भात मार्च महिन्यापासून वेळोवेळी अर्ज व निवेदन देऊन तसेच प्रत्यक्षात सांगून देखील पावसाचे पाणी जाण्याचे नियोजन असते ते अद्याप करण्यात आलेले नसून ,त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात मोठे नुकसान झालेले आहे. त्याकरीता संबंधित अधिकाऱ्यांना वेळोवेळी प्रत्यक्ष सांगून व पाहणी करुन देखील उपाययोजना करण्यास उडवाउडवीची उत्तरे देतात व शेतकरी बांधवास वेठीस धरून वेगवेगळे कारणे सांगून टाळाटाळ करतात.

असे सांगून शेतकऱ्यांनी पुढे या निवेदनात म्हटले आहे की शेतकऱ्यांच्या शेतात ज्या पिकांचे नुकसान झालेले आहे, ते तातडीने देण्यात यावे व जो नॅशनल हायवे तसेच भारत गॅस रिसोर्सेस लि. या कंपनीने गॅसची पाईपलाईन केल्यानंतर बऱ्याच ठिकाणी पावसाच्या पाण्याची अडवणूक करुन ठेवलेली आहे. त्यामुळे देखील शेतीमालाचे अतोनात नुकसान झालेले आहे. तसेच त्या सासलेल्या पावसाचे पाण्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे लहान मुलांना व शेतकरी बांधवांना होत आहेत त्या संबंधित ठेकेदाराला सांगून व संबंधित नॅशनल हायवेचे अधिकारी व गॅस पाईपलाईनचे अधिकारी यांनी रस्त्यालगत नाल्याचे नियोजन करून ज्या ठिकाणी येण्या जाण्यासाठी रस्ते किंवा वस्त्या आहेत, त्या ठिकाणी सिमेंट पाईप टाकून द्यावेत व शेतकऱ्यांना योग्य तो न्याय मिळवून द्यावा याकरिता आम्ही 6 ऑक्टोबर पासून सर्व न्याय मागण्यांकरिता तहसीलदार यांच्या कार्यालया समोर उपोषणाचा मार्ग अवलंबिला आहे. असे उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे.

या निवेदनावर अन्यायग्रस्त शेतकरी निलेश कुरुमकर, सुभाष होले, संपत होले, लहू होले, शिवाजी होले, दिलीप होले ,रामदास होले, सुरेंद्र शेंडगे, ऋषिकेश शेंडगे, राजेंद्र शेंडगे, सुदाम शेंडगे, बबन शेंडगे, संजना शेंडगे, मंगल शेंडगे आदि सह जवळपास 35 शेतकऱ्यांनी या निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या असून ,ते सर्व शेतकरी न्याय मिळेपर्यंत आमरण उपोषणावर ठाम आहेत या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी पोलीस निरीक्षक श्रीगोंदा व वरिष्ठ प्रशासनाला पाठवले आहेत.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.

शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा

श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.

श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका

श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार

विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे

सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता

श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद