श्रीगोंद्यातील स्विफ्ट गाडीचा पुणे - सोलापूर मार्गावर भीषण अपघात..! एक जण जागीच ठार.. तर, दोघे गंभीर जखमी

By : Polticalface Team ,Sat Oct 08 2022 09:45:55 GMT+0530 (India Standard Time)

श्रीगोंद्यातील स्विफ्ट गाडीचा पुणे - सोलापूर मार्गावर भीषण अपघात..! एक जण जागीच ठार.. तर, दोघे गंभीर जखमी दिनांक 8 ऑक्टोबर 2022, श्रीगोंदा: शुक्रवार दिनांक 7 ऑक्टोबर 2022 रोजी सायंकाळी 6:00 वाजण्याचा दरम्यान दौंड तालुक्यातील मळद येथे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या भुयारी मार्गावर लोखंडी सुरक्षाकठडे बसवणार्‍या कंत्राटदाराच्या उभ्या असलेल्या महेंद्र बोलेरो पिकअपला पाठीमागून वेगात येणाऱ्या मारुती स्विफ्ट डिझायर गाडीने धडक दिल्याने मोठा अपघात झाला. यात एक जण जागीच ठार झाला आहे. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

मळद येथे महामार्गावर सोलापूरकडून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर हा अपघात झाला. मळद येथील रेल्वे उड्डाण पुलाजवळील भुयारी मार्गावरील लोखंडी सुरक्षाकठडे बसविण्याचे दुरूस्तीचे काम करण्यात येत होते. हे काम संपून ठेकेदाराचे कामगार व पिकअप (MH.42, M.4926) चालक पिकअप रस्त्यावरून खाली लावण्याऐवजी कडेलाच उभे करून चहा प्यायला गेले.

यावेळी पाठीमागून वेगात जाणारी मारूती स्विफ्ट डिझायर गाडी पिकअपला पाठीमागून भिडली. नमूद अपघातात स्विफ्टमधील एक जण जागीच ठार झाला. स्विफ्ट मधील आणखी एक व पिकअपमधील एक कामगार असे दोघे जण गंभीर जखमी झाले. यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. अपघातात मृत व जखमी झालेले व्यक्तीची नावे व पत्ता समजू शकलेला नाही.

मात्र, अपघातातील स्विफ्ट गाडी श्रीगोंदा तालुक्यातील असल्याची माहिती मिळत आहे. जखमींना उपचारासाठी दौंडमधील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पिकअप चालकाच्या निष्काळजीपणामुळे एकाला जिव गमवावा लागला. अन दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात स्विफ्ट गाडीच्या पुढील बाजूचा चेदामेंदा झाला आहे.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.