यवत येथे मोहम्मद पैगंबर,(मिलाद उन नबी) यांची जयंती, हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्रित केली साजरी
By : Polticalface Team ,Sun Oct 09 2022 15:59:45 GMT+0530 (India Standard Time)
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता ०८ ऑक्टोबर २०२२, रोजी यवत पंचक्रोशीतील सर्व मुस्लिम बांधवांनी एकत्रित येऊन, हुजूर सल्लंल्ला वसंल्लम हजरत मोहम्मद पैगंबर, (मिलाद उन नबी) यांच्या जन्म दिनाच्या निमित्ताने, यवत पंचक्रोशीत मुस्लिम बांधवांनी या वर्षी प्रथम मोठ्या उत्साहाने, ईद ए मिलाद उन नबी यांच्या निमित्ताने भव्य दिव्य डि जे वाद्याच्या व फटाक्यांच्या धुमधडाक्यात मिरवणूक काढण्यात आली,
हजरत बडेशाहवली बाबा रहेमतुल्लांह अलैह दर्गा, पासुन सर्व मुस्लिम बांधवांनी व येथिल दारुल उलूम, मदरसा उर्दू शाळेतील विद्यार्थी आणि गावातील हिंदू मुस्लिम एकत्रितपणे,
ईद ए मिलाद उन नबी इस्लाम धर्मातील विविध धार्मिक कार्यक्रमांना पुर्वी पासुनच यवत गावातील ग्रामस्थ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत असतात, हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचा धार्मिक कार्यक्रम म्हणजे विजया दशमी दसरा महोत्सव, यवत गावातील ग्रामस्थ व नागरिक ग्रामदैवत श्री काळ भैरवनाथाची पालखी या दिवशी यवत येथील हजरत बडेशाहवली बाबा दर्गा येथे पारंपारिक पद्धतीने देवाची पालखी सोहळा विराजमान करुन या प्रसंगी (आपट्याची पाने) सोने लुटण्याचा कार्यक्रम मोठ्या दिमाखात हिंदू मुस्लिम एकत्रित येऊन एकमेकांची गळा भेट दिली जाते, दसऱ्याच्या मुहूर्तावर हिंदू मुस्लिम भाईच्यारा जपत सर्व गावकरी ग्रामस्थ नागरिक ही परंपरा कायम जपत असल्याचे दिसून येते, त्याच प्रमाणे, मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने इस्लाम धर्मातील धार्मिक कार्यक्रम मोहरम, संदल शरीफ, ईद ए मिलाद उन नबी, रमजान ईद, असे विविध धार्मिक कार्यक्रम, यवत येथील श्री काळभैरवनाथाच्या मंदिरासमोर साजरे केले जातात, त्याप्रसंगी गावातील हिंदू समाज मोठ्या संख्येने या कार्यक्रमांमध्ये उपस्थिती राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचा प्रयत्न केला जातो, हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्रितपणे धार्मिक कार्यक्रम राबवण्याची ही पद्धत पूर्वीपासूनच चालू आहे, हि मोठी वाखंण्याजोगी गोष्ट मानली जाते, महत्वाचे म्हणजे ईद ए मिलाद उन नबी या प्रसंगी मिरवणुकीत इस्लाम धर्माचा हिरवा ध्वज व भारतीय तिरंगा ध्वज मिरवणूकीत दोन्ही दिसुन आले,
यवत येथील मुख्य चौकात सार्वजनिक ठिकाणी श्री काळ भैरवनाथ मंदिरासमोर हिंदू मुस्लिम समाजातील
जेष्ठ मान्यवर ग्रामस्थ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती, या प्रसंगी यवत पोलीस निरीक्षक नारायण पवार यांचा यवत जुम्मा मज्जित ट्रस्टचे ट्रस्टी हाजी मुबारक भाई शेख यांच्या हस्ते, शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला, या वेळी बोलताना यवत पंचक्रोशीतील सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी ईद ए मिलाद उन नबी या हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती उत्साहात व आनदाने साजरी केल्याने, यवत पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी मुस्लिम बांधवांनी हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या, व कार्यक्रम अशाच प्रकारे शांततेत व आनंदात साजरा करण्याचे आवाहन केले, त्याच प्रमाणे यवत ग्रामपंचायत विद्यमान उपसरपंच सुभाष यादव, जि प, सदस्य गणेश कदम,पंचायत समिती माजी सदस्य कुंडलीक खुटवड, यांनी ही मनोगत व्यक्त करत हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या, इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांनी आपल्या मुस्लिम समाजातील सर्व स्तरातील लोकांना आमन आल्ला प्रति ईबादत ईमान कुराण शरीफ,देऊन इस्लाम धर्माची शिकवण दिली, इस्लाम धर्माच्या कॅलेंडर नेमानुसार तिसऱ्या महिन्यातील १२ तारखेला ५७० (ईस्वी) मध्ये अरब रेगिस्तान मंक्का या ठिकाणी हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्म झाला, या दिवशी ईद ए मिलाद उन नबी, जन्म महोत्सव विविध देशांतील व भारतीय मुस्लिम बांधव आनंद व दुःख एकाच दिवशी साजरा करण्यात येतो, कारण ?कालांतराने त्यांचा याच दिवशी इंतकाल झाल्याने या प्रसंगी सर्व मुस्लिम समाज बांधव कुराण शरीफ मधील आयाते पठण करण्यात येते, तसेच भारतीय संविधानाचा आदर करीत, आम्ही भारताचे लोक, या युक्तीप्रमाणे न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुता, सर्व धर्म समभाव जपण्याचा उपक्रम यवत येथे राबविला जातो, याची परीसरात मोठी चर्चा होत आहे, या प्रसंगी यवत ग्रामपंचायत विद्यमान सदस्य व माजी उपसरपंच सदानंद दोरगे, ग्रामपंचायत सदस्य इब्राहिम तांबोळी, ग्रामपंचायत सदस्य गौरव दोरगे, माजी ग्रामपंचायत सदस्य साजिद भाई सय्यद, उद्योजक संदीप दोरगे, विशाल शेठ भोसले, सुरज चोरगे, मयूर दोरगे, दिपक दोरगे, उपस्थित होते, याप्रसंगी यवत जुम्मा मज्जित ट्रस्टचे ट्रस्टी हाजी मुबारक भाई शेख, समीर भाई सय्यद, कमूबाई तांबोळी, हरुनभाई पठाण, उद्योजक इलाही भाई शेख, रियाजभाई सय्यद फारुख भाई शेख, यांनी आलेल्या सर्व हिंदू मुस्लिम बांधवांचे आभार व्यक्त केले, व मुख्य बाजारपेठेतील व्यापारी वर्ग व जमलेल्या सर्व बांधवांना शरबत वाटप करण्यात आले, मेहबूब तांबोळी, मुन्नाभाई तांबोळी, मोहसीन तांबोळी,जावेद भाई तांबोळी, अनिस भाई सय्यद, जावेद जंबु बेग, युवा तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते,
यवत पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी स्वतः उपस्थित, पोलीस कॉन्स्टेबल सुजित जगताप, सागर क्षीरसागर, किरण तुपे, दिपक यादव, पोलीस नायक पोलीस ना, विजय आवाळे, यांनी पुणे सोलापूर महामार्ग गर्दीच्या ठिकाणी दक्ष राहून बंदोबस्त करण्यात आला,
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.