दौंड तालुका आमदार यांना भांडगाव युवा उद्योजकांचे साकडे, अँड राहुल कुल यांनी विविध कंपण्यांना दिले सहकार्य करण्याचे पत्र

By : Polticalface Team ,Sun Oct 09 2022 22:50:06 GMT+0530 (India Standard Time)

दौंड तालुका आमदार यांना भांडगाव युवा उद्योजकांचे साकडे, अँड राहुल कुल यांनी विविध कंपण्यांना दिले सहकार्य करण्याचे पत्र दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता ०९ ऑक्टोबर २०२२, भांडगाव परिसरातील विविध कंपन्यांमध्ये स्थानिक तरुणांना रोजगार व व्यावसाय नोकरीत प्राधान्य मिळण्या कामी भांडगाव परिसरातील युवकांनी दौंड तालुका विद्यमान आमदार अँड राहुल कुल यांची भेट, घेऊन निवेदन दिले आहे, मौजे भांडगाव परीसरातील विविध कंपन्यांमध्ये स्थानिक तरुणांना रोजगार व व्यावसाय नोकरीत प्रथम प्राधान्य देऊ असे आश्वासन संबंधित कंपन्यांनी दिले असतानाही याकडे त्यांनी दुर्लक्ष केले आहे, पुर्वी भांडगाव ग्रामपंचायत हद्दीतील सर्व कंपन्यांना ग्रामपंचायत परवानगी देत असताना असे लेखी पत्राद्वारे कबुली दिली होती, याचा कंपन्यांना विसर पडला आहे, असा सवाल स्थानिक बेरोजगार व्यावसायिक युवकांनी गावा समोर उपस्थित केला आहे, यामध्ये कोणतेही राजकारण न करता स्थानिक बेरोजगार युवक तरुणांना प्रामुख्याने कंपनीमध्ये रोजगार व्यवसायात प्रथम प्राधान्य मिळावे, हि रास्त भूमिका आहे, यामध्ये हा लढा गावातील सर्व सामान्य युवा तरुणांनी हाती घेऊन, गाव हिताचा लढा उभारण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले, दौंड तालुक्याचे विद्यमान आमदार राहुल कुल यांना भांडगाव युवा उद्योजकांनी साकडे घातले आहे, स्थानिक युवकांना डावलण्यात आले असल्याने तरुणांनी नक्की करायचे तरी काय,? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे, या वेळी भांडगाव परीसरातील, युवा तरुण, बेरोजगार व्यावसायिक महिंद्र दोरगे, विजय दोरगे, संतोष दोरगे, अतुल दोरगे, संदीप दोरगे, प्रमोद दोरगे, श्याम कापरे, बंटी दोरगे, दत्ता दोरगे, बाबू सटले, अक्षय दोरगे, आदी युवा तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते, भांडगाव ग्रामपंचायत हद्दीतील विविध कंपन्यांमध्ये स्थानिक तरुणांना रोजगार व्यवसाय नोकरी पासून वंचित ठेवण्यात आले आहे, गावातील युवा तरुणांनी करायचे तरी काय असा सवाल युवा तरुण व्यवसायिकांनी उपस्थित केला आहे, भांडगाव मध्ये सध्या १५ ते २० कंपन्या कार्यरत असून त्यामध्ये गावातील स्थानिक व्यावसायिक तरुणांना व्यवसायासाठी प्रथम प्राधान्य दिले जावे अशी विनंती भांडगाव ग्रामपंचायतीला मागील दोन वर्षांमध्ये वेळोवेळी करण्यात आली होती, या अनुषंगाने ग्रामपंचायतीने विविध कंपन्यांना स्थानिक तरुणांना रोजगार व व्यावसायिक प्रथम प्राधान्य देण्याऐवजी प्राथमिकता वजा पत्र जमा केली आहेत, त्यामुळे सदर स्थानिक तरुणांना भांडगाव मधील टेस्टीबाईट प्रायव्हेट लिमिटेड, विटगन प्रायव्हेट लिमिटेड, पारख अँग्रो प्रायव्हेट लिमिटेड, वेस्टर्न मेटल प्रायव्हेट लिमिटेड, प्रवीण मसाले प्रायव्हेट लिमिटेड, या कंपन्यांमध्ये स्थानिक युवा तरुणांना रोजगार व व्यवसायासाठी नकारात्मक भूमिका घेण्यात आलेली सोडावी व स्थानिक युवा तरुणांना रोजगार व व्यवसायासाठी संधी उपलब्ध करून देण्यात यावी अशी भुमिका दौंड तालुका विद्यमान आमदार राहुल कुल यांनी घेतली आहे, तसे लेखी निवेदन संबंधित कंपन्यांना देण्यात आले आहे, सदर निवेदनाचा तत्काळ विचारपूर्वक निर्णय घेण्यात यावा, असे आमदार राहुल कुल यांनी सांगितले असुन या संदर्भात हवी ती मदत करण्याचे आश्वासन स्थानिक युवा तरुणांना व संबंधित कंपन्यांना इशारा देण्यात आला आहे, त्यामुळे आता भांडगाव ग्रामपंचायत हद्दीतील विविध कंपन्या संदर्भात पुढील काळात युवा तरुण बेरोजगार व व्यावसायिक नक्की काय भूमिका घेणार याकडे परीसरातील व तालुक्यातील बेरोजगार युवकांचे लक्ष लागले आहे,
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.

शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा

श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.

श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका

श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार

विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे

सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता

श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद