आ.रणजितसिंह मोहिते-पाटील व मा.आ.नारायण पाटील यांचा करमाळा व माढा तालुक्यातील अतिवृष्टी पाहणी दौरा संपन्न
By : Polticalface Team ,Mon Oct 10 2022 08:53:11 GMT+0530 (India Standard Time)
करमाळा प्रतिनिधी:
कंदर ता.करमाळा येथे अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या क्षेत्राची आ.रणजितसिंह मोहिते पाटील व माजी आ.नारायणआबा पाटील यांनी पाहाणी केली. या परिसरातील १२०० हेक्टरच्या आसपास क्षेत्रावरील केळी,ऊस,कांदा मका ही पीके अतिवृष्टीमुळे बाधित झाली आहेत.संबधित अधिकार्यांशी चर्चा करुन पंचनामे उद्यापासुनच करुन पंचनामे करताना सर्व बाधित शेतकर्यांना न्याय मिळाला पाहीजे अशा सुचना आमदार महोदयांनी केल्या.
यावेळी मा.जि.प सभापती शिवानाना कांबळे, अदिनाथचे मा.व्हा.चेअरमन नानासाहेब लोकरे, मा.संचालक शिंदे भाऊसाहेब,भारतनाना पाटील, भाजपा तालुका सरचिटणीस अमरजित साळुंखे, बंडू माने, अनिल यादव,विजय नवले,अजित वगरे,सुभाष पवार,संतोष माने,अतिवृष्टी बाधित शेतकरी, नायब तहसीलदार, कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक उपस्थित होते.
वडशिवणे ता.करमाळा येथील ब्रिटीशकालीन तलाव नैसर्गिकरित्या २२ वर्षानंतर भरत आहे,या तलावाद्वारे मलवडी पाथर्डी,घोटी वडशिवणे केम सातोली,सांगवी या भागातील सुमारे १५०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते,आज तलाव सांडवा लेव्हलपर्यंत भरल्यानंतर पाण्याचे पुजन आ.रणजितसिंह मोहिते पाटील व मा.आ.नारायणआबा पाटील यांचे हस्ते करण्यात आले.तसेच वडशिवणे येथे अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या क्षेत्राची पहाणी केली.यावेळी ,मा.जि.प सभापती शिवानाना कांबळे,दत्ताबापु साळुंखे, अमरजित साळुंके, सरपंच विशाल जगदाळे, मा.सरपंच संतोष कवडे,कुबेर कोडलिंगे,किसन मोरे,सुरज कवडे,मा.सरपंच कालिदास पन्हाळकर,लक्ष्मण मोरे,ज्ञानदेव शिंदे,कालिदास तोरसकर,श्रीमंत कवडे,महेश जगदाळे.अतिवृष्टी बाधित शेतकरी,कृषीअधिकारी,सर्कल,तलाठी आदि उपस्थित होते
केम ता.करमाळा येथे अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या क्षेत्राची आ.रणजितसिंह मोहिते पाटील व मा.आ.नारायणआबा पाटील यांनी पहाणी केली.केम परिसरातील उडीद, मका,तुर,कांदा ,ऊस पीकाखालील सुमारे ३५० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.अनेक ठिकानी ओढ्याकाठच्या जमिनी खरवडुन गेल्या आहेत सर्वांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी कोणतेही निकष न ठेवता पंचनामे करण्याचे संबधित अधिकार्यांना आमदार महोदयांनी सुचना केल्या.प्रसंगी गावातील कुंकु कारखानदार,व्यापारी,रेल्वे प्रवासी यांनी विविध समस्या मांडल्या त्या सोडवण्यासाठी अधिकार्यांशी चर्चा करुन केमच्या सर्वांगीन विकासासाठी कटीबद्ध असल्याचे अश्वस्त केले.
यावेळी मा.जि.प.सदस्य दिलीपदादा तळेकर, मा.जि.प,सभापती शिवाजी कांबळे,मा.जि.प सदस्या सवीताराजे भोसले,भारतनाना पाटील,अजित तळेकर, मा.पं,स सभापती शेखर गाडे,सरपंच अकाश भोसले,उपसरपंच नागन्नाथ तळेकर, भाजपा ता. सरचिटणीस अमरजित साळुंके, प्रहार चे ता.अध्यक्ष संदीप तळेकर,रेल्वे प्रवासी संघटनेचे मनोज सोलापुरे,राजेंद्र गोडसे,सुदर्शन तळेकर, सरपंच प्रतिनिधी शितलकुमार मोटे, मनोज तळेकर,बाळासाहेब बिचितकर,सचिन बिचीतकर,गणेश तळेकर,सागर नागटीळक,धनंजय ताकमोगे,सावंत मामा, विकास काळसाईत, कृषी अधिकारी, सर्कल तलाठी,ग्रामसेवक आदि उपस्थित होत
ढवळस ता.माढा येथे अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या क्षेत्राची आ.रणजितसिंह मोहिते पाटील व मा.आ.नारायणआबा पाटील यांनी पहाणी केली.अतिवृष्टीमुळे पाण्याच्या प्रवाह वाढल्याने ढवळस-निमगाव रस्त्यावर बेंदओढ्यावरील पुल वाहुन गेला असुन संबधित रस्त्याचे मजबुतीकरण व पुलाची उंची वाढवण्यासंदर्भात नागरिकांनी मागणी केली त्याचा शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे अश्वासन दिले.या परिसरातील सुमारे ५०० हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील केळी,ऊस, उडीद,मका,कांदा मिरची पीकांचे नुकसान झाले आहे.त्याचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले.
यावेळी,शिवानाना कांबळे,भारत नाना पाटील,तात्या गोडगे,कुबेर अनुभुले,राहुल अनुभुले,आप्पा दोलतोडे,धनाजी दोलतोडे,किशोर बोरकर,देवकर सर,संतोष काळे विलास मंगवडे,अरुण काळे,मनोज अनुभुले,आबा ठोंबरे,कृषीसहाय्यक,नायब तहसिलदार,मंडल अधिकारी तलाठी आदि उपस्थित होते
चौभे_पिंपरी ता.माढा येथील पाझर तलाव अतिवृष्टीमुळे ओव्हरफ्लो होउन भराव फुटुन सुमारे ५०० हेक्टर पेक्षा पीकांचे नुकसान झालेले आहे,त्याठिकाणी भेट देवुन आ.रणजितसिंह मोहिते पाटील व मा.आ.नारायणआबा पाटील यांनी पहाणी केली.तलावाखालील २५ ते ३० विहीरी गाळाने बुजुन गेलेल्या असुन बोअरवेल सहित १५० पेक्षा जास्त विजपंप,स्टार्टर बाॅक्स वाहुन गेले असुन पाईप व केबल यांचे ही नुकसान झालेले आहे त्याचे त्वरीत सरसकट पंचनामे करण्याच्या सुचना दिल्या.तसेच पाझर तलावाच्या दुरुस्तीसाठी ६० लाख रुपयांच्या निधीचा प्रस्ताव राज्यशासनाकडे पाठवण्याच्या सुचना सोलापुर जिल्हा जलसंधारण विभागाला दिल्या.
यावेळी मा.जि.प.सभापती शिवानाना कांबळे,भारतनाना पाटील,तात्या गोडगे,योगेश जाधव,किशोर बोरकर,सतिश दुर्गुडे,हणुमंत खताळ,दत्तात्रय खताळ,प्रशांत अलदर,नाना गोफणे,बिरुदेव खताळ नायब तहसिलदार,कृषीसहाय्यक,सर्कल आदि उपस्थित होते
रोपळे ता.माढा येथे विजयगंगा ओढ्यावरील नवीन बंधार्यातील पाण्याचे पुजन आ.रणजितसिंह मोहिते पाटील व मा.आ.नारायणआबा पाटील यांचे शुभहस्ते करण्यात आले.तसेच अतिवृष्टीमुळे या ओढ्यावरील रोपळे-चौभेपिंपरी रस्त्यावरचा नवीन पुल पाण्याखाली गेला आहे.त्याची उंची वाढवण्यासाठी संबधित अधिकार्यांना आ.महोदयांनी सुचना केल्या.तसेच गेल्या दोन वर्षापुर्वी वृक्षारोपण केलेल्या रोपळे येथील सह्याद्री देवराईतील वृक्षांची पहाणी केली.
यावेळी मा.जि.प.सभापती शिवानाना कांबळे,भारतनाना पाटील,तात्या गोडगे,भाऊ पवार,शरद पाटील, जगदिशराजे निंबाळकर,आण्णासाहेब पवार,आदम मुलाणी, श्रीपाद दळवी,नानासाहेब दास,रंगनाथ काळे,लिंबाजी साबळे,शफीक बागवान,निखील जगताप,सुधिर गोडगे आदि उपस्थित होते.
ईद ए मिलाद निमित आज रोपळे ता.माढा येथील मस्जिद ला भेट दिली व मुस्लीम बांधवांना ईद ए मिलाद च्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी मा.जि.प.सभापती शिवानाना कांबळे भारतनाना पाटील तात्या गोडगे,आदम मुलाणी शफीक बागवान,खाजुभाई मुलाणी,आसिफ मुलाणी उपस्थित होते.
कुर्डुवाडी परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे कुर्डु व कुर्डुवाडीतील पंढरपुर रोड लगतच्या लोकवस्तीमध्ये पाणी शिरल्यामुळे अनेकांचे संसार पाण्याखाली गेले असुन अन्नधान्यांचे व घरातील वस्तु तसेच रोडलगतच्या दुकानात पाणी शिरल्याने फर्निचर,इलेक्ट्राॅनिक वस्तु यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे.या ठिकाणी मा.आ.नारायणआबा पाटील यांचेसह भेट देवुन पाहाणी केली.या व्यतिरीक्त ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालेले आहे त्या ठिकाणचे त्वरीत पंचनामे करुन जास्तीत जास्त मदत करण्याच्या सुचना संबधित अधिकार्यांना केल्या.
यावेळी मा.जि.प सभापती शिवानाना कांबळे,भारतनाना पाटील,उद्योग आघाडीचे सुहास शहा,भाजप शहरअध्यक्ष शंकर बागल,तात्या गोडगे,अनंत राऊत,उमेश पाटील,विक्रम बोरकर,सुधीर गाडेकर,प्रवीण सोमासे,महीला आघाडीच्या प्रतिक्षा गोफणे,पद्मावती दातार,रेशमा जाधव,व्यापारी आघाडीचे निलेश सुराणा,सागर शर्मा,बालाजी गायकवाड,विवेक दिक्षीत,सुनिल पारखे,प्रदिप मराळ,रामा मोरकाणे,संतोष गवळी,स्वप्निल गोरे,व पत्रकार बांधव उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.