By : Polticalface Team ,Mon Oct 10 2022 20:01:05 GMT+0530 (India Standard Time)
यावेळी ते परब म्हणाले की, अंधरेची पोटनिवडणूक महाविकास आघाडीतर्फे लढवण्यात येणार आहे. आज सकाळी महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले, भाई जगताप यांनी उद्धव ठाकरे यांना भेटून पाठिंबा जाहीर केला. तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील आपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे 3 नोव्हेंबरला होणारी पोटनिवडणूक ही महाविकास आघाडीच्यावतीने लढली जाणार असल्याचं परब म्हणाले.
दरम्यान, अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचा आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा कोणाला? अशी चर्चा सुरु होती. मात्र आता ही पोटनिवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. तर अंधेरी पूर्व मतदार संघातील शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली आहे. आता या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे वाचक क्रमांक :