पुणे जिल्हा परिषद यशवंतराव चव्हाण भवन शिक्षण विभागाला, जिजाऊ ब्रिगेड अध्यक्षा सारिकाताई भुजबळ यांनी धरले धारेवर

By : Polticalface Team ,Tue Oct 11 2022 20:00:14 GMT+0530 (India Standard Time)

पुणे जिल्हा परिषद यशवंतराव चव्हाण    भवन शिक्षण विभागाला, जिजाऊ ब्रिगेड अध्यक्षा सारिकाताई भुजबळ यांनी धरले धारेवर दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता,१० ऑक्टोबर २०२२, रोजी पुणे जिल्हा परिषद यशवंतराव चव्हाण भवन शिक्षण विभाग प्राथमिक, या कार्यालयामार्फत दि,०३/१०/२०२२, ते २०/१०२०२२,या कालावधीमध्ये जिल्ह्यात सर्वत्र मा यशवंतराव चव्हाण कला क्रीडा सांस्कृतिक स्पर्धा घेण्याबाबत सूचित करण्यात आले होते, परंतु पावसाचे वातावरण विचारात घेता त्यामध्ये अंशत: बदल करण्यात आला आहे, केंद्रस्तर ते तालुकास्तरावरील मा, यशवंतराव चव्हाण कला क्रीडा सांस्कृतिक स्पर्धां दि,२२ नोव्हेंबर २०२२,पर्यंत घेऊन दि, २४ नोव्हेंबर २०२२,रोजी तालुका स्तरावर प्रथम स्थान प्राप्त केलेल्या स्पर्धांचा निकाल जिल्हा कार्यालयात सादर करण्यात यावे असे दुरुस्ती केलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे, मा यशवंतराव चव्हाण कला क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे नियोजन करण्यात आले होते, यामध्ये इ,१ ली ते ५ वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्य विद्यार्थ्यांना नैतिक मूल्यांवर आधारित भजन,भक्ती गीत,व गवळण गाणे, १) झाला महार पंढरीनाथा) २) कानडा राजा पंढरीचा) या विषया संदर्भात जिजाऊ ब्रिगेड, दौंड तालुका अध्यक्षा सारिकाताई भुजबळ यांनी दि,१०/१०/२०२२, रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी मा संध्या गायकवाड यांना लेखी निवेदन देऊन आक्षेप व विरोध दर्शवण्यात आल्याने, सदर मा यशवंतराव चव्हाण कला क्रीडा सांस्कृतिक स्पर्धा, इ,१ ली, ते इ,५ वी मधील विद्यार्थ्यांच्या बालमनावर जिल्हा परिषदेला नेमकं काय रुजवायचे आहे, ? असा सवाल उपस्थित करत, पुणे जिल्हा परिषद प्राथमिक मुख्य शिक्षण अधिकारी संध्या गायकवाड यांना विचारले, तसेच महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे जगद्गुरु संत तुकाराम महाराज संत कबीर, राष्ट्रीय संत गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, ते संत जनाबाई अशा अनेक संतांनी आपल्या वागमयातून असंख्य अभंग रचले असताना फक्त चोखामेळा याचाचं जातीय उल्लेख असणारा अभंग प्रामुख्याने का घेण्यात आला, ? या मागे जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे काय धोरण आहे हे स्पष्ट कळावे,असा प्रश्न भुजबळ यांनी उपस्थित केला, तसेच वकृत्व स्पर्धेसाठी फक्त २) झाशीची राणी लक्ष्मीबाई अस का,? या संदर्भात आम्ही आपणास विनंती करतो की, या महाराष्ट्रा मध्ये स्वराज्य संकल्पक राजमाता मासाहेब जिजाऊ पुण्यामध्ये ज्यांनी शिक्षणाची ज्योत पेटवली अशा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले प्रजादक्ष अहिल्याबाई होळकर त्यागमूर्ती महामाता रमाई आंबेडकर, क्रांती कन्या मुक्ता साळवे पहिल्या प्राध्यापिका फातिमाबीबी शेख, अशा या सर्व कर्तृत्ववान राष्ट्रमाता यांचाही कुठेतरी समावेश करण्यात यावा,असा सल्ला त्यांनी पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभागाला देण्यात आला, यावर जिल्हा परिषद पुणे यशवंतराव चव्हाण भवन शिक्षण विभाग मुख्य अधिकारी संध्या गायकवाड यांनी त्वरित दिलगिरी व्यक्त करून, सदरचे विषयी स्पर्धेमध्ये घेण्यामागे कोणत्याही संघटनेला किंवा जातीवादयुक्त कोणालाही दुखावण्याचा हेतू नाही,असे स्पष्ट केले मा,यशवंतराव चव्हाण कला क्रीडा सांस्कृतिक स्पर्धांचे परिपत्रकातील आक्षेप असलेल्या नैतिक मूल्यावर आधारित वकृत्व स्पर्धा इ,१ली, ते ५ वी, साठी,भजन भक्ती गीत व गवळण गाणे, या ठिकाणी दुरुस्ती करून १) थोर समाजसेविका व थोर समाज सुधारक यापैकी कोणत्याही एका समाज सुधारक बाबत भाषण करणे, असा करण्यात आला असल्याचे परिपत्रक काढण्यात आले असल्याचे पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभाग मुख्य अधिकारी संध्या गायकवाड यांनी सांगितले,या वेळी जिजाऊ ब्रिगेड पुणे महानगर अध्यक्षा शिवमती स्मिताताई मस्कर, शिवमती शोभाताई जगताप, शिवमती गीता गाढवे, शिवमती प्रियंका पाटील, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक शिवश्री संतोष शिंदे, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, शिवश्री उत्तम कामठे,संभाजी ब्रिगेड जिल्हा संघटक भारत भुजबळ, शिवश्री शाम पाटील पुणे जिल्हा व शहर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते,
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.