By : Polticalface Team ,Wed Oct 12 2022 19:55:22 GMT+0530 (India Standard Time)
नागवडे यांनी प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे की, कारखान्याचे सुमारे अडीच ते तीन हजार सभासद मयत आहेत. त्यापैकी बहुतेक मयत सभासदांच्या वारसांनी शेअर्स वर्ग करून घेणे करिता आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करून दिलेले नाही. त्यामुळे ते शेअर्स वारसदारांचे नावावर वर्ग होऊ शकलेले नाहीत. तथापि जे सभासद मयत झाले आहेत त्यांच्या वारसांनी सभासद साखर विक्री कार्ड व स्वतःचे ओळखपत्र घेऊन आपल्या गटाच्या संबंधित साखर वाटप केंद्रावर जावे. त्यांना साखर दिली जाईल. तथापि जे सभासद मयत आहेत. त्यांच्या वारसांनी लवकरात लवकर कागदपत्रांची पूर्तता करून आपले शेअर्स वर्ग करून घ्यावेत. अन्यथा त्यांना सभासद म्हणून कारखान्याकडून इतर कोणत्याही सुविधा दिल्या जाणार नाहीत. असे नागवडे यांनी सांगितले.
नागवडे यांनी पुढे सांगितले की नागवडे कारखान्यास सन २०२१-२२ या गळीत हंगामात ऊस पुरवठा करणाऱ्या सर्व सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आतापर्यंत २४३४ रुपये ८५ पैसे याप्रमाणे एफ आर पी पेमेंट पूर्ण अदा केलेले आहे.
परंतु आपण जाहीर केलेल्या रुपये दोन हजार सहाशे एक प्र. मे. टनापैकी त्यांना उर्वरित रक्कम रुपये १६६.१५ याप्रमाणे रक्कम येत्या १७ तारखेला संबंधित सभासद शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार असल्याचे नागवडे यांनी सांगितले.
तसेच येत्या १५ -१६ ऑक्टोबर पासून कारखान्याचा गाळप हंगाम नियमितपणे सुरू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ----आप्पा चव्हाण वाचक क्रमांक :