कुरकुंभ येथील ईप्को प्रो ग्रीन (ईशा अँग्रो) कंपनीतील कामगारांना कामावरून काढल्याने मानव अधिकार संघटनेच्या वतीने आंदोलनाचा इशारा
By : Polticalface Team ,Thu Oct 13 2022 08:42:07 GMT+0530 (India Standard Time)
दौंड, प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता,१२ ऑक्टोबर २०२२,कुरकुंभ एम आय डि सी मधील ईप्को प्रो ग्रीन (ईशा अँग्रो) कंपनीचे मॅनेजर एच आर विद्या शिंदे, यांनी कामगार १) आकाश सुभाष गायकवाड, २) नितेश दरवेश परदेशी, ३) रत्नदीप अशोक गायकवाड, या कामगारांना विनाकारण पूर्वसूचना न देता
कामगारांना तडकाफडकी कामावरून काढून टाकले आहे, हा कामगारांवर केलेला अन्याय सहन केला जाणार नाही, असे दौंड तालुका मानव अधिकार संघटनेचे अध्यक्ष भारत सरोदे यांनी सांगितले, कुरकुंभ एम आय डि सी मधील ईप्को प्रो ग्रीन ईशा अँग्रो कंपनीचे, एच आर,व मॅनेजर विद्या शिंदे यांनी जाणीवपूर्वक स्थानिक कामगारांना कामावरून काढून टाकल्यामुळे या कंपनीच्या विरोधात दौंड तालुका मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटनेचे अध्यक्ष भारत सरोदे यांनी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे, या बाबत दि,११ ऑक्टोबर २०२२, रोजी दौंड तालुका तहसीलदार कार्यालय, दौंड पोलीस ठाण्यात व संबंधित कंपनीला निवेदनाच्या माध्यमातून व पत्राद्वारे इशारा देण्यात आला आहे, कुरकुंभ येथील ईप्को प्रो ग्रीन ईशा अँग्रो कंपनीचे व्यवस्थापक मेघा नंदर्गीकर यांना कामगारांनी वेळोवेळी संपर्क साधण्याचा आटोकाट प्रयत्न केला मात्र एच आर, व मॅनेजर विद्या शिंदे यांनी कामगारांना कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापकांना भेटण्याची संधीच येऊ दिली नाही, टाळाटाळ केली,
कामगार कायद्यानुसार १८० दिवस काम करणाऱ्या कोणत्याही कामगाराला सेवेतून कमी करता येत नाही, सदर कामगार हे ऑगस्ट २०२१ पासुन कंपनीमध्ये प्रामाणिकपणे काम करीत आहेत, कंपनीचे कोणतेही नुकसान या कामगारांनी केले नसताना दि २४ /०८/२०२२, रोजी पासुन कंपनीचे एच आर, व मॅनेजर विद्या शिंदे यांनी तीन कामगारांना तडकाफडकी कामावरून काढून टाकले आहे, सदर कामगार हे कंपनीच्या रेगुलर वेळेपेक्षा अधिक ओव्हरटाईम काम करीत होते, कंपनीचे नियमाप्रमाणे प्रत्येक तासाला दुप्पट पगार मिळणे अपेक्षित असताना व देणे आवश्यक असताना, मात्र, एच आर व मॅनेजर संगनमताने, हजेरी रजिस्टर मध्ये खाडाखोड करून ओव्हरटाईम तास कमी लावले असल्याचे निदर्शनास आले असल्याचे स्पष्ट झाले होते, एच आर व मॅनेजर विद्या शिंदे, यांचे हे बेकायदेशीर कृत्य उघडकीस येईल या भीतीने कामगाराबद्दल एच आर, व मॅनेजर विद्या शिंदे यांनी व्यवस्थापकांना चुकीची माहिती देऊन, सदर प्रमाणिक कामगारांना कामावरून काढण्यात आले, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे, त्यामुळे स्थानिक तरुणांना बेरोजगार करण्यात आले आहे, कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापकांनी या संदर्भात सखोल चौकशी करून दोन दिवसात सत्य खुलासा शोधून काढावा व कामावरून काढलेल्या कामगारांना पुन्हा कामावर रुजू करून घ्यावे असे दौंड तालुका मानव अधिकार व भ्रष्टाचार संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहे,
सदर कामगारांना कामावर रुजू करून न घेतल्यास दोन दिवसात कामगारांना संघटीत करून जनआंदोलन करण्याचा इशारा दौंड तालुका मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटनेचे तालुका अध्यक्ष भारत सरोदे यांनी, निवेदनाद्वारे इशारा दिला असल्याचे नमूद करण्यात आले आहे,
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.