वडगाव निंबाळकर येथील एक व्यक्ती गेली पुराच्या पाण्यामध्ये वाहून
By : Polticalface Team ,Fri Oct 14 2022 17:55:07 GMT+0530 (India Standard Time)
अमोल गायकवाड- वडगाव निंबाळकर
बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथे गेले दोन दिवसापासून मुसळधार पाऊस होत असल्याने वडगाव निंबाळकर येथील ओढ्याला मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. या पुरामध्ये वडगाव निंबाळकर येथील नरेश साळवे वय 50 हा व्यक्ती पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेला आहे. या घटनेला दोन दिवस उलटून गेले तरी त्याचा अद्याप तपास लागलेला नाही. हा इसम वडगाव निंबाळकर येथील बाजार रोड कडून भैरवनाथ मंदिर या दिशेने ओढ्याला पूर असताना देखील पाण्यातून जात होता. मध्यभागी गेल्यानंतर पाण्याचा वेग जास्त असल्याने हा इसम पाण्यामध्ये वाहून गेला आहे.
वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांना ही घटना समजताच ते तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. व शोध कार्य चालू केले. अद्याप पोलिसांच्या हाती वाहून जाणाऱ्या व्यक्तीची कोणत्याही प्रकारची माहिती मिळालेली नाही. ही घटना समजताच पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि वडगाव- मोरगाव जिल्हा परिषद मतदार संघाचे विद्यमान सदस्य विश्वासराव देवकाते पाटील यांनी घटनास्थळाला तत्काळ भेट देऊन पाहणी केली. आणि बारामतीचे प्रांत अधिकारी यांना भ्रमणध्वनीवरून तत्काळ मदत कार्य करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी वडगाव निंबाळकर येथील बाजार रोड येथील ओढ्या वरील नवीन पूल करण्याची मागणी वैभव साळवे व आर्यन साळवे यांनी विश्वासराव देवकाते पाटील यांच्याकडे केली. यावेळी बहुजन हक्क परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे युवक अध्यक्ष पै नानासाहेब मदने तालुका युवक अध्यक्ष अमोल गायकवाड हिरवे कंट्रक्शनचे मालक मोहन हिरवे वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे पत्रकार संतोष भोसले,निलेश साळवे, जितेंद्र पवार, हिरवे कंट्रक्शनचे मालक मोहन हिरवे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाचक क्रमांक :