पुणे सोलापूर डेमो (पॅसेंजर) रेल्वे गाडी नं,११४२१,पुणे सोलापूर डेमो एक्सप्रेस, यवत स्टेशन येथे का ? थांबत नाही
By : Polticalface Team ,Sat Oct 15 2022 17:35:47 GMT+0530 (India Standard Time)
दौड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता,१५ ऑक्टोबर २०२२,पुणे रेल्वे जंक्शनवरुन सकाळी ८:३० वा, सुटणारी रेल्वे गाडी नं ११४२१,( पुणे सोलापूर डेमो (पॅसेंजर) ही रेल्वे गाडी यवत स्टेशन येथे सकाळी ९:१० वा, थांबत होती मात्र कोरोना लॉकडाऊन नंतर याच पॅसेंजर रेल्वे गाडीचे नाव बदलुन, पुणे सोलापूर डेमो एक्सप्रेस करण्यात आले आहे, हीच रेल्वे गाडी हडपसर, लोणी काळभोर, उरुळी कांचन, येथे थांबत आहे, मात्र यवत स्टेशन येथे सकाळी ९:१०, वा, का ? थांबत नाही, या बाबत विभागीय रेल्वे व्यवस्थापक डी आर एम, सेंट्रल रेल्वे पुणे कार्यालय, वरीष्ठ अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे, या संदर्भात दौंड तालुक्यातील नागरिकांनी वेळोवेळी मागणी केली आहे, यवत स्टेशन येथे सकाळी ९:१० वा,११४२१ नंबर पुणे सोलापूर डेमो एक्सप्रेस ही रेल्वे गाडी यवत स्टेशन येथे थांबावी, या बाबत रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करीत आहेत, त्यामुळे दौंड तालुक्यातील जवळपास २५ ते ३० गावातील प्रवाशांनी व अपडाऊन करणाऱ्या शासकीय निमशासकीय कर्मचारी ग्रामस्थांनी या संदर्भात बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रियाताई सुळे, व दौंड तालुका विद्यमान आमदार अँड राहुल कुल, यांच्याकडे यवत पंचक्रोशीतील प्रवासी ग्रुपने निवेदनाद्वारे, यवत रेल्वे स्टेशन येथे रेल्वे गाडी नंबर ११४२१ पुणे सोलापूर डेमो एक्सप्रेस थांबवी, अशी मागणी केली असल्याने, लोक प्रतिनिधी बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी,दि,१४ मार्च २०२२ रोजी व दौंड तालुका आमदार अँड राहुल कुल यांनी दि,१४ फेब्रुवारी २०२२ रोजी या विषयी रेल्वे प्रशासन विभागीय रेल्वे व्यवस्थापक डी आर एम, सेन्ट्रल रेल्वे पुणे कार्यालय यांना पत्राद्वारे, मागणी केली आहे, तसेच यवत ग्रामपंचायत सरपंच समीर दोरगे यांनी दि,१२ एप्रिल २०२२ रोजी यवत ग्रामस्थांच्या वतीने पुणे सोलापूर डेमो एक्सप्रेस हि रेल्वे मौजे यवत स्टेशन येथे सकाळी ९:१० वा,थांबावी अशी मागणी केली आहे,
परंतु विभागीय रेल्वे व्यवस्थापक डी आर एम, सेन्ट्रल रेल्वे पुणे, विभागाने याबाबत दुर्लक्ष केले आहे,
यवत स्टेशन येथे पुणे सोलापूर डेमो एक्सप्रेस रेल्वे गाडी थांबावी असा अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही, त्यामुळे दौंड तालुक्यातील नागरिकांची प्रवास दरम्यान गैरसोय दिवसांन दिवस वाढत चालली आहे, दौंड तालुका पश्चिम भागातील दौंड व सोलापूर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना धावपळ करावी लागत आहे, महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ११४२१ नंबर, पुणे सोलापूर डेमो पॅसेंजर, ही रेल्वे गाडी कोरोना लॉकडाऊन पुर्वी यवत येथे थांबत होती, मात्र कोरोणा लॉकडाऊन नंतर ही ११४२१ नं,पुणे सोलापूर डेमो एक्सप्रेस असा नावात बदल केल्या पासून ही रेल्वे गाडी फक्त यवत येथे थांबणे बंद झाली आहे, पुणे जंक्शन पासुन हडपसर लोणी काळभोर उरुळी कांचन, या ठिकाणी थांबते मात्र
ही पुणे सोलापूर डेमो एक्सप्रेस रेल्वे गाडी यवत येथे सकाळी ९:१० वा, थांबत नाही, पुढे दौंड व सोलापूर कडे जाते, त्यामुळे यवत पंचक्रोशीतील अनेक शासकीय व निमशासकीय तसेच सोलापूर कडे जाणाऱ्या प्रवाशांना नाहक धावपळ करावी लागत आहे, त्यामुळे दौंड तालुका पश्चिम भागातील प्रवाशांसाठी ११४२१ नंबर पुणे सोलापूर डेमो एक्सप्रेस ही रेल्वे गाडी यवत येथे सकाळी ९:१० वा थांबावी या संदर्भात
सेंट्रल रेल्वे पुणे वरिष्ठ अधिकारी यांनी या संदर्भात तात्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी दौंड तालुक्यातील मौजे यवत पंचक्रोशीतील प्रवासी नागरिकांनी मागणी केली आहे,
विभागीय रेल्वे व्यवस्थापक डी आर एम सेन्ट्रल रेल्वे पुणे कार्यालय, वरीष्ठ अधिकारी यांनी तत्काळ दखल घेऊन ११४२१ नंबर पुणे सोलापूर डेमो एक्सप्रेस ही रेल्वे गाडी यवत येथे थांबावी अशी व्यवस्था करण्यात यावी,
त्यामुळे यवत परीसरातील दौंड व सोलापूर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना धावपळ करावी लागणार नाही
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.
शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा
श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.
श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका
श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर
वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार
विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे
सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता
श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न
अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात
दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील
महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.
दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.
सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन
अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद