बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथे पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या इसमाचा मृतदेह अखेर सापडला

By : Polticalface Team ,Sun Oct 16 2022 20:35:16 GMT+0530 (India Standard Time)

बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथे पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या इसमाचा  मृतदेह  अखेर सापडला वडगाव निंबाळकर-अमोल गायकवाड बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथे तीन दिवसापूर्वी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता. या पावसामुळे वडगाव निंबाळकर येथील ओढ्याला मोठ्या प्रमाणात पूर आला होता. या पुराच्या पाण्यामध्ये वडगाव निंबाळकर येथील इसम नरेश साळवे (वय वर्ष 50) हा पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेला होता. गेले तीन दिवसापासून हा इसम बेपत्ता होता. ओढ्याला पाणी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शोध कार्य करण्यास अडचण निर्माण होत होती. शेवटी आपत्ती व्यवस्थापन संघ पिंपरी चिंचवड येथील कार्यकर्त्यांनी आज सकाळी शोध घेण्यास सुरुवात केली. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले. आणि नरेश साळवे हा इसम पाण्यामध्ये वाहून गेलेला होता तो आज सकाळी वडगाव निंबाळकर येथील कोराळे खुर्द रोडवरील काकडे वस्तीच्या नजीक त्यांचा मृतदेह आढळलेला आहे.

हा मृतदेह शोधण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन संघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष संतोष शेलार, आपत्ती राष्ट्रवादी सेलचे पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष करीम सय्यद सदस्य सागर जाबरे, संदीप गव्हाणे, निलेश कुसाळकर, दिलीप गायकवाड, मनोज साळवे यांच्या प्रयत्नांमुळे हा मृतदेह सापडण्यास मदत झाली आहे .

यावेळी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे पी एस आय सलीम शेख कर्मचारी महेंद्र फणसे, बाळासाहेब खोमणे, पोपट नाळे, सागर चौधरी वडगाव निंबाळकर महसूल विभागाचे शिवदत्त चव्हाण वडगाव निंबाळकर ग्रामपंचायतचे सदस्य संजय साळवे यांचेही विशेष सहकार्य लाभले आहे. यावेळी मृतदेहाचा पंचनामा करून वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनने मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. अधिक तपास वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार महिंद्र फणसे करीत आहे.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.