यवत गावात अनोळखी लोकांचा वावर चौकात रास्ता वाहतूक कोंडी, तर थोड्याच दिवसात ओळख करून शेतकऱ्याची फसवणूक

By : Polticalface Team ,Mon Oct 17 2022 21:44:02 GMT+0530 (India Standard Time)

यवत गावात अनोळखी लोकांचा वावर   चौकात रास्ता वाहतूक कोंडी, तर थोड्याच दिवसात ओळख करून शेतकऱ्याची फसवणूक दौड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता १७/१०/२०२२, यवत गावठाणातील विविध ठिकाणी रस्ता कोंडीचा प्रश्न निर्माण झाला आहे, कमी वयातील मुलांना टुव्हीलर मोटरसायकल चालवण्यात व रायडींग करण्यात आनंद वाटत आहे, अनेक वेळा मोटरसायकल रायडींग पाहून व हॉर्नच्या आवाजाने जेष्ठ नागरिकांना धडकी भरत आहे,त्यामुळे जेष्ठ नागरिकांच्या समस्या वाढत चालल्या आहेत, जेष्ठ नागरिक रस्त्यात आहेत त्या ठिकाणी शांत उभे राहिल्या शिवाय दुसरा पर्याय उरत नाही, मात्र असे अपघात रोखण्यासाठी निर्बंध घातले पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे, तसेच परीसरातील विविध कंपनीत व गुऱ्हाळांवरती व्हीपी बिहार कामगार वर्ग मोठ्या संख्येने दिसत आहेत, गावातील सुव्यवस्था ढासळत चालली आहे, परीसरात ठिक ठिकाणी अनोळखी तरुण व्यक्ती दिसून येत आहेत, कामगार वर्ग भाडेतत्त्वावर रुम घेऊन, यवत परीसरात व भांडगाव परीसरात राहत आहेत, घर मालकांनी अनोळखी व्यक्तीला घर भाड्याने देताना त्यांनी यांचे आधार कार्ड, मुळ ठिकाणाची चौकशी करूनच घर भाडेकरू ठेवावेत, अशी ग्रामस्थांच्यात चर्चा होत आहे, आठ दिवसांपूर्वी यवत येथील एका शेतकऱ्यांना लाखो रुपयाचा गंडा घालण्यात आला आहे, ऊसतोड मजुरांची टोळी घेऊन येतो असे सांगून कुटुबासह पसार झाला आहे, या ऊसतोड मजुर कुटुंबालाने थोड्याच दिवसात ओळख निर्माण केली होती, ऊसतोड मजुरांच्या टोळ्या गावाकडुन घेऊन येतो, मालक उचल द्या असे सांगत, आपल्या थोड्या दिवसाच्या ओळखीचा फायदा घेऊन, गावातील शेतकरी यांची फसवणूक केली असल्याची चर्चा आहे, त्यामुळे यवत गावातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांनी व भाडेतत्त्वावर घर देणाऱ्या घर मालकांनी सावध भुमिका घेतली पाहिजे, अनोळखी व्यक्तीशी आर्थिक व्यवहार टाळावेत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे, यवत येथील चौकातील रस्ते वाहतूक कोंडीवर उपाय योजना करावी, सेवा मार्गावर रात्रीच्या वेळी वाहनांची पार्किंग होत आहे, हे वाहन चालक सेवा मार्गावर पार्किंग समजुन वाहन लावत आहेत, या वाहतूक वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सेवा मार्गावरुन पाऊसाचे पाणी वाहत आहे, बस स्टॅन्ड समोरील पुलाखाली गुडघाभर पाणी साठत आहे, सेवा मार्गाच्या दोन्ही बाजूने मोठ्या ट्रेनिज लाईन कशासाठी आहेत हाच खरा प्रश्न निर्माण झाला आहे, पाऊसाचे पाणी ड्रेनिज लाईन मध्ये जात नाही, मात्र संबंधित कॉन्ट्रॅक्टर वेळोवेळी दुरुस्ती करून बिलिंगच्या फाईल तयार करत आहेत, काम मात्र जैसे थे जशाच्या तसंच दिसून येत आहे, त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पुणे वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे बोलले जात आहे,
यवत गावातील वाहतूक कोंडी संदर्भात उपाय योजना राबविण्यात यावी, मोटरसायकल चालक सुसाट रायडींग करत आहेत, वाहन परवाना तपासणी केल्यास या वाहन चालकांना आळा बसेल ? अशी प्रतिक्रिया यवत गावातील ग्रामस्थ व नागरिकांनी व्यक्त केली असुन, यवत पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्याकडे मागणी करत गावठाणातील रस्ता वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर चिंता व्यक्त केली आहे, व सदर प्रकरणी टुव्हीलर व फोर व्हीलर वाहने चालकांवर वचक बसेल असे उपाय योजना करण्यात याव्यात अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे,

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.