राज्याला परतीच्या पावसानं झोडपलं, आज या जिल्ह्यांना पावसाचा इशारा

By : Polticalface Team ,Tue Oct 18 2022 09:50:03 GMT+0530 (India Standard Time)

राज्याला परतीच्या पावसानं झोडपलं, आज या जिल्ह्यांना पावसाचा इशारा पुणे : राज्यात परतीच्या पावसानं थैमान घातलंय. या पावासामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालंय. राज्यात मुंबईसह ठाणे परिसरात पावसानं जोरदार हजेरी लावलीय. त्याचबरोबर पुणे जिल्ह्यात तर पावसानं दमदार बॅटींग केलीय. पुण्याच्या विविध भागात पाणी शिरल्याचं पाहायला मिळालं. दुसरीकडं अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, वाशिम या जिल्ह्यांना पावसानं चांगलचं झोडपलंय. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आजही राज्यात पावसाची शक्यता वर्तवलीय. आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट दिलाय.

राज्याच्या विविध भागात परतीच्या पावसानं धुमाकूळ घातलाय. यामुळं नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांचं रुप आल्याचं दिसून आलं. त्यामुळं वाहतुकीवर देखील परिणाम होत आहे. या परतीच्या पावसाचा मोठा फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसलाय. त्यांची उभी पिकं वाया गेली. शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास या पावसानं हिरावून घेतलाय. सर्वातधिक फटका सोयाबीन आणि कापसाला बसलाय. त्यामुळं राज्यातील शेतकरी हवालदिल झालाय.

परतीच्या पावसानं पुण्यात जोरदार हजेरी लावलीय. पुण्यात विविध ठिकाणी रस्त्यांना नद्यांचं रुप आल्याचं दिसून आलं. दगडूशेठ मंदिरात देखील पाणी शिरलं. मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून रात्री उशारीपर्यंत पाणी बाहेर काढण्याचं काम सुरु होतं. या पावसामुळं वाहतुकीवर चांगलाच परिणाम झालाय.

गत 15 दिवसांपासून कोल्हापूर शहर परिसरासह जिल्ह्यात परतीचा पाऊस बरसतोय. हवामान विभागाकडून कोल्हापूरसह 9 जिल्ह्यांमध्ये 18 ते 20 ऑक्टोबर या कालावधीत ऑरेंज अलर्ट जारी केलाय. कोल्हापूर तसेच मुंबई, पुणे, सिंधुदुर्ग, सातारा, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.

शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा

श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.

श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका

श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार

विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे

सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता

श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद