पहा पेडगाव येथील सरस्वती नदीच्या पुलावरील प्रवाशांच्या जीवघेणा प्रवास सुरू
By : Polticalface Team ,Tue Oct 18 2022 23:10:21 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा प्रतिनिधी
श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील सरस्वती नदीवरील पूल प्रवाशांच्या जीवावर बेतण्याची भीती निर्माण झाली आहे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे काष्टी सिद्धटेक रोडवर पेडगाव येथील
सरस्वती नदीच्या पुलावरील पाणी पातळी मध्ये वाढ होत असून
यामध्ये अनेक प्रवासी आपला जीव धोक्यात टाकून वाहतूक करीत आहेत
या ठिकाणी जीवीत हानी होण्याआधी स्थानिक प्रशासन विभाग यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे
सरस्वती नदीच्या पुलावरील मोठ मोठे खड्डे पडले आहेत पुलाच्या कामामध्ये वापरलेले लोखंडी रॉड उभे आडवे झालेले आहे त्यामुळे अनेक अपघात देखील होत आहेत
वाचक क्रमांक :