खडकी येथे मुसळधार पावसाने प्रचंड नुकसान: पंचनामे करण्याची मागणी
By : Polticalface Team ,Thu Oct 20 2022 08:04:12 GMT+0530 (India Standard Time)
करमाळा: प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील
खडकी परिसरात ढगफुटीसदृश्य मुसळधार पावसाने प्रचंड नुकसान झाले असुन या भागातील नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी खडकी चे सरपंच बळी शिंदे यांनी शासनाकडे केली आहे.
सोमवारी रात्री व मंगळवारी दुपारी परतीच्या ढगफुटीसदृश्य पाऊसाने ग्रामस्थांची दाणादाण उडाली आहे. अनेकांची पिकै जमीनदोस्त झाली आहेत.तर अनेकांची पिके पाण्यात गेली आहेत.अनेकांच्या शेताच्या ताली फुटल्या आहेत.या तुफानी पाऊसाने शेतातील पिके पाण्यात गेली आहेत.तलाठी व शासन याकडे दुर्लक्ष करत आहेत. नावाला पंचनामे करू असे अश्वासन देत आहेत.65 मिमि पेक्षा कमी पाऊस पडल्याचे बोलत आहेत. या भागात पर्जन्यमापक यंत्रच लावलेले नाही तर पाऊस कसा मोजतात असा सवाल बळी शिंदे यांनी केला आहे. करमाळा मंडळात खडकी गाव येत आहे .मांगी , जातेगाव खडकी याठिकाणी पाऊस झाला त्यावेळी करमाळा शहरात पाऊसच नव्हता. इकडे मात्र पाऊसाने जनजीवन विस्कळीत केले होते. त्यामुळे करमाळ्यातील न पडलेल्या पाऊसाचा निकष येथे लावून शेतक-यावर अन्याय शासन करत आहे. त्यामुळे प्रत्येक मंडळातच नाही तर प्रत्येक गावात पर्जन्यमापक यंत्र लावूनच 65 मिमि पाऊसाचा निकष लावावा. शासनाने शेतक-यांची मागणी गाभिर्याने घेऊन सरसकट पंचनामा करावा व नुकसान भरपाई ही द्यावी अन्यथा तीव्र अंदोलन करण्याचा इशारा सरपंच बळीराम शिंदे यांनी शासनाला दिला आहे.
वाचक क्रमांक :