अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याचा गुन्हा तपासात दिरंगाई,
पोलिस निरक्षक यांची चौकशी करून निलंबीत करण्याबाबत चर्मकार संघटनेच्या वतीने निवेदन .
By : Polticalface Team ,Thu Oct 20 2022 08:08:31 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा :
हातावर पोट असणा-या गरीब चर्मकार कुटुबांतील अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याचा गुन्हा दि . २ ९ / ०८ / २०२२ रोजी दाखल होऊन तब्बल ५० दिवस झाले असुन . कर्त्यव्यास कसुर केल्याच्या अनुशांगणे पोलिस निरक्षक यांची चौकशी करून निलंबीत करण्याबाबत . चर्मकार संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. हातावर पोट असणा-या गरीब चर्मकर कुटुंबातील अल्पवयीन मुलगी दिनांक २ ९ / ०८ / २०२२ शाळेतुन बेपत्ता झाल्याची घटना घडली असुन श्रीगोंदा पोलिस स्टेशला 29/08/2022 रोजी गून्हा हि दाखल झाला. तब्बल ५० दिवस झाले तरी अल्पवयीन बेपत्ता मुलगी श्रीगोंदा पोलीस प्रशासनास सापडत नाही . बेपत्ता अल्पवयीन मुलीचे वडील व कुटुंबातील सदस्य पोलिस निरिक्षक यांच्याकडे चौकशी करीता वेळोवेळी विनंती करीत होते परंतु पोलीस निरीक्षक हे त्या कुटुंबाला धमकावतात, दमबाजी करुन उडवाउडवीचे उत्तर देऊन वेळोवेळी हाकलुन देत. बेपत्ता मुलगी सापडत नाही म्हणुन त्या कुटुंबाने दि . १०/१०/०२२ रोजी तहसील कार्यालय , येथे अमरण उपोषणास बसले व आत्मदहणाचा इशारा दिला त्या नंतर आरोपी व आरोपींना मदत करणा-या आठ लोकांवर अॅट्रॉसिटी व पोक्सो गुन्हा दाखल झाला असुन आज पर्यन्त बेपत्ता मुलाचा शोध लागला नसून सर्व आरोपी मोकाट फिरत आहेत . सदर घटनेमध्ये मोठा आर्थिक व्यवहार / तडजोड झाल्याची मोठी चर्चा होत आहे . पोलिस निरीक्षक यांनी आपल्या कर्तव्यात कसुर करतांना बेपत्ता अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यासाठी तपास व इतर कुठलीही ठोस कारवाई केलेली दिसत नाही व कामामध्ये टाळाटाळ केल्याचे दिसून येत आहे, म्हणून त्यांचे त्वरीत निलंबित करुन सदर अल्पवयीन मुलीचा शोध का लागत नाही याची चौकशी करावी . पोलीस निरीक्षक यांच्या विषयी जनसामान्यांत अनेक तक्रारी असून जनता त्यांच्या कामकाजाणे त्रस्त झालेली आहे . शाखा पोलीस अधिक्षक कार्यालय अहमदनगर तरी बेपत्ता अल्पवयीन मुलीचा शोध दोन दिवसांत लावण्यात यावा , मुलीच्या जिवीतास धोका निर्माण झाल्यास त्यास संपुर्णत : पोलीस प्रशासन जबाबदार राहील. अल्पवयीन मुलीचा शोध प्रकरणी पोलीस निरीक्षक यांच्यावर कारवाई झाली नाही तर संघटना तीव्र आंदोलन छेडेल आशा प्रकारचे निवेदन चर्मकार विकास संघ चे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर यांचा वतीने पोलिस अधिक्षक यांना देण्यात आले.
वाचक क्रमांक :