यवत येथे अवकाळी पावसाने फुल शेती पाण्यात, तर शेतकऱ्यांची शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी

By : Polticalface Team ,Thu Oct 20 2022 08:33:17 GMT+0530 (India Standard Time)

यवत येथे अवकाळी पावसाने फुल शेती पाण्यात, तर शेतकऱ्यांची शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता १९ ऑक्टोबर २०२२, दौंड तालुक्यात या ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवाती पासून सुरू झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली जात आहे, सोमवारी (दि १७) रोजी मध्ये रात्री पासुनच सतत धार पाऊसाने जोर धरला होता, यवत येथील शेतकरी प्रामुख्याने उत्पन्नाचे साधन म्हणून, या भागात फुल शेती अनुकूल वातावरण असल्याने भुलेश्वर पायथ्याशी सर्रास शेतकरी फुल शेती प्रामुख्याने केली जाते,
दसरा दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर फुलांची विक्री जोरदार होते, वर्षाकाठी काही दिवसात हाताशी येणारे पिक म्हणजे फुल शेती अधिक उत्पन्नाचे साधन असते, या भागातील सर्रास शेतकरी शेतीमध्ये विविध रंगीबेरंगी फुलांचा मळा नटलेल्या निसर्ग सौंदर्याचा व सुगंध दरवळला जातो, दसरा दिवाळी दरम्यान या भागातील शेतकरी कुटुब रात्रंदिवस शेतामध्ये वास्तव्य करत असतात, मात्र या वेळी परतीच्या पावसाने थंयमान घातल्याने हाता तोंडाला आलेला घास विरळला आहे, वर्षाची आर्थिक पुंजी डळमळीत झाली असून वार्षिक उत्पन्नाला खिळ बसली आहे,
ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच पाऊसाने सुरुवात केल्यामुळे फुल शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान माथी पडले आहे,
काही दिवसापासून शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने व मेहनत फुल शेती फुलवली होती, मात्र पावसाचे पाणी साचून, शेतातील राजा शेवंती, झेंडू, भाग्यश्री, गोल्डन, बिजली, सेंट व्हाईट, पोर्णिमा व्हाईट, या बहरलेल्या फुलांची रोप झाडे पावसाच्या पाण्यात बुडाल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत आला असल्याने हातबल झाला आहे,
यवत पंचक्रोशीतील सर्व भागात पाऊस झाल्याने, शेतीमध्ये व रस्त्यावर पाणी साचले होते, यवत भुलेश्वर पायथ्याशी फुलांची शेती, मोठ्या प्रमाणात असते, मानकोबा वस्ती, मलभरे वस्ती, दोरगेवाडी खूपटे वस्ती, येथील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे,
यवत, उंडवडी, भोसलेवाडी, खामगाव, तांबे वाडी, कासुर्डी भरतगाव सहजपूर या पंचक्रोशीतील सर्व भागात पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्याने शेतातील साचलेल्या पाण्यात बाजरी पिकाचे लोटांगण सर्रास भागात झाल्याचे आढळून आले आहे, काढणीला आलेल्या बाजरीचे पिक पाण्यात पडल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, जोरदार पाऊसाने काही ठिकाणी बाजरीचे व फुलांचे पिकच वाहुन गेली आहेत,
त्यामुळे शासनाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची दखल घेऊन, पावसामुळे झालेल्या पिकांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे,

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड नगरपरिषद निवडणूक प्रचार सभा जोरदार. मी कामाचा माणूस आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार.

दौंड नगरपरिषद निवडणूक प्रचार सभा जोरदार. मी कामाचा माणूस आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार.

दौड शुगर साखर कारखान्यात एका उस वाहनाचे दोन वेळा वजन करून आर्थिक फसवणुक प्रकरणी ऋषिकेश गिरीधर चैंडे याचे विरुद्ध गुन्हा दाखल.

ओंकार साखर ग्रूप कर्मचाऱ्यांसाठी २०% पगारवाढ जाहीर.चेअरमन मा.श्री.बाबुराव बोत्रे पाटील.

दौंड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 दौंड शहरातील मतदार जन जागृती पथनाट्याने नागरिकांचे लक्ष वेधले

कुरकुंभ येथील देवांश पान शॉप टपरीच्या आडोशाला देशी दारू टँगो पंच विक्री अट्यावर पोलिसांची कारवाई आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

यवत ग्रामपंचायत कार्यालयात आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे. आदर्श पिता रामजी बाबा आंबेडकर. पंडित जवाहरलाल नेहरू. महापुरुषांची जयंती साजरी.

देवदर्शन यात्रेला गेलेल्या बसचा भीषण अपघात 20 महिला जखमी

श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्रीगोंदा नगरपालिका निवडणुक महाविकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरू. यवत नगरी हरिनामाने झाली भक्तीमय

नगराध्यक्ष पदासाठी इंद्रायणी पाचपुते चर्चेत ? श्रीगोंदा नगरीत वातावरण वातावरण सस्पेन्स .!

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न