करमाळा एसटी आगाराने खास दिवाळीनिमित्त केल्या जादा बसेसचे आयोजन आगार व्यवस्थापिका अश्विनी किरगत यांची माहिती
By : Polticalface Team ,Thu Oct 20 2022 22:31:58 GMT+0530 (India Standard Time)
करमाळा प्रतिनिधी करमाळा एसटी आगाराने करमाळा तालुक्यातील प्रवाशा करिता खास दिवाळी सणानिमित्त जादा नवीन बसेस चालू केली असल्याची माहिती आगार व्यवस्थापिका अश्विनी किरगत यांनी ही माहिती दिली
प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी खास दिवाळीच्या सणानिमित्त करमाळा एसटी आगर नवीन बस चालू करून प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे सध्या दिवाळी मुळे सर्वांना आपापल्या घरी जाण्याचे, खरेदी साठी घराबाहेर पडण्याचे वेध लागले आहेत. सर्व सामान्यांची लगबग पाहता करमाळा आगाराकडून दिवाळी साठी ज्यादा बसेस सोडण्यात येणार आहेत. यामध्ये करमाळा - सातारा, करमाळा नाशिक, करमाळा - पुणे, करमाळा - अजंठानगर या मार्गांवर बसेस ची संख्या वाढवण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. करमाळा - सातारा हे करमाळा आगारातून सकाळी 7 वाजता अकलूज मार्गे सातारा ला पाठवण्यात येईल. तसेच सर्वात जास्त बसेस ची करमाळा - पुणे या मार्गावर वाढवण्यात आलेली आहे. करमाळा पुणे ही बस नव्यानेच पहाटे साडेपाच वाजता चालू केली आहे तसेच या बसेस आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. तरी प्रवाशांनी सदर बसेस चा लाभ घ्यावा, असे आवाहन करमाळा आगार प्रशासनातर्फे केलेले आहे.
करमाळा एसटी आगाराने खास दिवाळीनिमित्त चालू केलेल्या नवीन जादा बसेस चा लाभ प्रवाशांनी जास्तीत जास्त संख्येने घेऊन करमाळा आगाराच्या उत्पन्नात वाढ करून सहकार्य करावे असे आवाहन आगार व्यवस्थापिका अश्विनी किरगत यांनी केले आहे
वाचक क्रमांक :