By : Polticalface Team ,Thu Oct 20 2022 22:34:45 GMT+0530 (India Standard Time)
करमाळा( प्रतिनिधी)
गेली महिनाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड अशी नुकसान झाले असून हा पाऊस थांबवा म्हणून करमाळ्यातील जागृत देवस्थान खोलेश्वर महादेवाच्या मंदिराला आज बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या वतीने साकडे घालण्यात आले
शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे युवा सेना जिल्हा समन्वयक क निखिल चांदगुडे युवा सेना तालुकाप्रमुख राहुल कानगुडे शहर प्रमुख विशाल गायकवाड शिवसेनेचे उपशहर प्रमुख नागेश गुरव खोलेश्वर मंदिराची ट्रस्ट शहापुरी गुरुजी आधी पदाधिकाऱ्यांनी खोलेश्वर महाराजाला पाण्याचा अभिषेक घालून पाऊस थांबण्याची विनंती केली
करमाळा तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून खरीप हंगामातील सर्व पिके अतिवृष्टीने वाया गेली आहे अजूनही शेतात प्रचंड पाणी असून रब्बीतील ज्वारीची पेरणी होणार नाही आता पाऊस उघडला नाही तर रब्बीतले गहू हरभऱ्याची सुद्धा पेरणी होणार नाही यामुळे आता हा पाऊस थांबावा व शेतकऱ्याचे वरील पावसाचे संकट दूर व्हावे यासाठी बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या वतीने हा अभिषेक करण्यात आला
###############
करमाळा तालुक्यात अतिवृष्टीने नुकसान झाले शेतकऱ्याचे पंचनामे सुरू असून पंचनामे करण्यास कुठेही अधिकारी टाळाटाळ करत असल्यास त्यांनी शिवसेनेच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आव्हान जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांनी केले आहे
######
वाचक क्रमांक :