अखेर 33 वर्षानंतर रयत को-ऑप बँक प्रस्थापितांच्या जोखडातून मुक्त

By : Polticalface Team ,Sat Oct 22 2022 12:43:31 GMT+0530 (India Standard Time)

अखेर  33 वर्षानंतर रयत को-ऑप बँक प्रस्थापितांच्या जोखडातून मुक्त श्रीगोंदा : दि रयत सेवक को-ऑपरेटिव बँक निवडणुक 2022-27 च्या धुमशानीत श्री. नंदकिशोर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली रयत मित्रमंडळाचे धडाडीचे 11 शिलेदार विजयी झाले. बँक निवडणुकीस 16 ऑक्टोबर रोजी मतदान होऊन सातारा येथे 18 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होऊन निकाल लागला. अत्यंत अटीतटीच्या लढतीमध्ये मित्र मंडळाने तब्बल 33 वर्षानंतर आपले निर्विवाद वर्चस्व निर्माण केले आहे. रयत मित्र मंडळ पॅनलतर्फे सर्वसाधारण गटातून रयत मित्र मंडळ संघटनेचे अध्यक्ष श्री नंदकिशोर गायकवाड यांनी सर्वाधिक मताधिक्य घेऊन त्यांच्यासह श्री अशोक कोलते, श्री विक्रमसिंह देसाई, श्री दीपक भोये तर सातारा कार्यक्षेत्रातून श्री श्रीराम केदार, श्री राजेंद्र शिर्के, अहमदनगर कार्यक्षेत्रातून श्री अशोक झरेकर, पुणे कार्यक्षेत्रातून श्री सुरेश तिटकारे, विमुक्त जाती जमाती/ विशेष मागास प्रवर्गातून डॉ. धनंजय कच्छवे, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गामधून श्री दिलीप तुपे आणि महिला प्रवर्गातून श्रीमती ज्योत्स्ना बाळसराफ विजयी झाल्या. तसेच अत्यंत तोकड्या मतांच्या फरकाने विजयी होऊ न शकणाऱ्या श्री बालाजी बोंबडे, श्री बाळासाहेब जगताप, श्री भिमा लेंभे, श्री बबन माने, श्री रमेश खुटारकर व सौ अनुसया मरभळ यांनी अत्यंत चिवटपणे झुंजार अशी लढत दिली. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे विरोधामध्ये असणाऱ्या रयत सेवक संघ व स्वाभिमानी कल्याण मंडळ यांच्या पॅनलमध्ये माजी सचिव, सहसचिव, इन्स्पेक्टर, लाईफ वर्कर, जनरल बॉडी सदस्य यांसारखे दिग्गज प्रचारासाठी मैदानात उतरले होते. त्यामुळे ही निवडणूक प्रस्थापितांविरुद्ध सर्वसामान्य सभासद अशीच पहावयास मिळाली. रयत सेवक मित्र मंडळाने कोणावरही टीका-टिप्पणी न करता आपला 13 कलमी जाहीरनामा सभासदांपुढे मांडला आणि सर्वसामान्य सभासदांनी त्यांना मताच्या रूपाने भरभरून साथ दिली. या निवडणुकीमध्ये रयत मित्र मंडळाचे जुने जाणते मार्गदर्शक श्री शरद यादव सर, श्री शिंगाडे बापू , श्री अर्बुने एम आर, श्री कारभारी वेलजाळी सर, श्री सोनाजी भोसले, श्री हनुमंत काटकर सर, श्री अरविंद खराडे सर यासारख्या ज्येष्ठांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. याशिवाय उपाध्यक्ष मुख्याध्यापक श्री खंडू कांबळे सर आणि संघटनेतील सर्वच पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन या विजयोत्सवात मोलाची कामगिरी बजावली. दिवाळीच्या तोंडावर लागलेल्या या निकालांमुळे समस्त रयत सेवकवृंद आनंदून गेला आहे. रयत सेवक मित्र मंडळ आपल्या धडाडीच्या कामामुळे ओळखले जात असून येणाऱ्या पाच वर्षांमध्ये सभासदाभिमुख कारभार करणार आणि प्रत्येक सभासदाने मतदानातून मित्र मंडळावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविणार. हा विजय केवळ उमेदवारांचा नसून सर्वसामान्य सभासदांचा आहे. सभासदांच्या बँकेत सभासदांची सत्ता मिळवून संघटनेचे संस्थापक सदस्य कै. प्रा. तुकाराम दरेकर सर व माजी अध्यक्ष श्री रामनाथ काळे सर यांचे स्वप्न पूर्ण झाले, अशी भावना अध्यक्ष श्री नंदकिशोर गायकवाड यांनी यावेळी व्यक्त केली.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.