श्रीगोंदा सहकारी नागवडे कारखान्याकडून १५ कोटी वर्ग.
By : Polticalface Team ,Sun Oct 23 2022 08:43:37 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा :
कारखाना मे.टन याप्रमाणे सुमारे १३ कोटी ५० लाख रुपये १७ ऑक्टोबर रोजी ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले . श्रीगोंदा सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याकडून १५ कोटी ६० लाख रुपयांचे पेमेंट सभासद शेतकरी व कामगारांना अदा करण्यात आले . मुळे ऐन दिवाळीच्या वेळी हातात पैसे आल्यामुळे कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद , शेतकरी व कामगारांची त्याचबरोबर व्यापारी दुकानदारांची दिवाळी गोड होणार असल्यामुळे समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून , सभासद शेतकरी व कामगार वर्गाकडून कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे , व्हाईस चेअरमन बाबासाहेब भोस व संचालक मंडळाचे शेतकऱ्यांकडून अभिनंदन होत आहे . नागवडे कारखान्याने सन २०२१ २२ मध्ये गाळप केलेल्या उसाची एफ आर पी यापूर्वीच शेतकऱ्यांना अदा केलेली आहे . परंतु गळीत हंगाम सुरू होताना कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांनी सन २०२१-२२ या गळीत हंगामाकरिता २६०१ रुपया प्रमाणे ऊस दर जाहीर केला होता . गळीत हंगाम बंद झाल्यानंतर शासनाच्या नियमाप्रमाणे रुपये २४३४ पैसे ८५ याप्रमाणे एफआरपीची रक्कम कारखान्याने ऊस उत्पादकांना अदा केली होती . परंतु जाहीर केलेल्या २६०१ मधील उर्वरित पेमेंट १६६ रुपये १५ पैसे प्र . विशेष आभार व्यक्त केले आहेत . व्यवस्थापनाने सभासदांना दिवाळी करिता साखर वाटपाचे गटवार व अतिशय सूत्रबद्ध नियोजन केले असल्यामुळे सर्व सभासदांना अतिशय सुलभरीत्या साखर उपलब्ध झालेली आहे . त्याचप्रमाणे कामगारांनाही सवलतीच्या दरात दिवाळीसाठी साखर विक्री केल्यामुळे सर्वांची दिवाळी गोड होणार आहे . दिवाळी गोड केल्याबद्दल सभासद शेतकरी व कामगारांकडून चेअरमन , व्हाईस चेअरमन , संचालक मंडळ व कार्यकारी संचालक यांचे शेतकऱ्यांकडून अभिनंदन करण्यात येत आहे . त्याचप्रमाणे प्रतिवर्षीप्रमाणे कामगारांना दीपावली करिता नऊ टक्के बोनस , मागील सन २०१५ च्या करारामधील फरकाचा पहिला हप्ता व पगार मिळून सुमारे दोन कोटी दहा लाख रुपये कामगारांना अदा करण्यात आलेले आहेत . त्यामुळे सभासद शेतकरी व कामगार वर्गाच्या मनामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
वाचक क्रमांक :