धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग बनतोय मृत्युमार्ग..आज पुन्हा एक अपघात.
By : Polticalface Team ,Tue Oct 25 2022 10:38:03 GMT+0530 (India Standard Time)
बीड :
आज सकाळी साडे अकरा वाजता पुन्हा एक अपघात.....
धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग वर्दळीचा असुन शहरातुन बार्शीकडे जाणारा रस्ता धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या बाह्यवळण रस्त्यावर एकत्र येतो या रस्त्यावरून बार्शीरोडकडे जाणारी वाहने व धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही पदरावरून धावणा-या गेवराई कडुन मांजरसुंभाकडे व मांजरसुंब्याकडुन गेवराईकडे जाणारी वाहने या चौकात कायम एकमेकांना क्राॅस करत असतात तसेच शहरातुन जालना रोडकडे जाणारा रस्ता व व धुळे-सोलापूर रस्त्यावर एक महालक्ष्मी चौक असुन या रस्त्यावर शहरात येणारी व शहरातुन जाणारी वाहने रोज क्राॅसिग होतात. महामार्गावरील वाहने अतिशय वेगात असल्याने याठिकाणीही अपघात मोठ्याप्रमाणात यापुर्वीही घडलेले आहेत. त्यामुळेच या दोन्ही ठिकाणी उड्डाणपूलांची आवश्यकता आहे.
वाचक क्रमांक :