आईचे छत्र हरपलं..! मात्र; ही पोकळी बऱ्याच प्रमाणात कमी करण्याचे कामं आपलं गाव व मातृभूमीने केले! शिवाजीराव डांगे (जी एस टी आयुक्त, गुजरात).

By : Polticalface Team ,Thu Oct 27 2022 08:47:53 GMT+0530 (India Standard Time)

आईचे छत्र हरपलं..! मात्र; ही पोकळी बऱ्याच प्रमाणात कमी करण्याचे कामं आपलं गाव व मातृभूमीने केले! शिवाजीराव डांगे (जी एस टी आयुक्त, गुजरात). श्रीगोंदा प्रतिनिधी दिनांक २६ ऑक्टोबर २०२२, श्रीगोंदा: दिवाळी भाऊबीज निमित्त घन:श्यामअण्णा शेलार यांनी वडाळी गावामध्ये एक अनोखा उपक्रम राबवला यामध्ये शिवाजीराव डांगे जीएसटी आयुक्त गुजरात यांना निमंत्रित करण्यात आले होते.वडाळी गाव माहेर असलेल्या मुलींना, भगिनींना एकत्रित बोलवून, घन:श्याम अण्णा शेलार आणि त्यांच्या कुटुंबामार्फत भाऊबीजेचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुजरात राज्याचे जीएसटी आयुक्त शिवाजीराव डांगे हे होते. तर, या कार्यक्रमांमध्ये सिताराम काकडे (जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अहमदनगर) यांनी व्याख्यानातून आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला हभप बाळकृष्ण महाराज दळवी सर यांचे कीर्तन झाले. याप्रसंगी वडाळी गावातील बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

व्याख्यानातून आपले विचार व्यक्त करताना सिताराम काकडे यांनी नमूद केले की, माता भगिनी प्रत्येक क्षेत्रात आहेत, त्यांना कोणते क्षेत्र वर्ज नाही. स्त्रियांच्या हातात जग गेलं तर, जगाचं नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही. एवढे सामर्थ्य माता-भगिनी मध्ये आहे. इतिहासात जिजाऊ अहिल्या आणि सावित्रीने ते सिद्ध करून दाखवलं आहे. एक स्त्री इतिहास घडू शकते जिजाऊने शिवाजींना जन्म दिला आणि शिवाजींनी इतिहास घडवला. पुढे बोलताना ते म्हणाले की, पाश्चिमात्य देशात जर शिवाजी महाराजांचा जन्म झाला असता तर, आम्ही हॅरी पॉटरच्या कथा सांगण्याऐवजी शिवाजी महाराजांच्या कथा जगाला सांगितल्या असत्या. यावेळी त्यांनी जगद्गुरु तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली तसेच विविध संतांचे दाखले देत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

कार्यक्रमाचे आयोजक घन:श्याम शेलार यांच्या विषयी बोलताना काकडे म्हणाले की, जर घन:श्याम शेलार या तालुक्याचे आमदार झाले असते तर, त्यांच्यावर देशाचे नेते शरदचंद्र पवार यांनी मोठी जबाबदारी दिली असती.जेणेकरून या जिल्ह्यासह तालुक्याचे भले झाले असते. कुकडीचे पाणी तालुक्यात येण्यामागे अण्णाचें मोठे कष्ट आहे. असेही काकडे यावेळी म्हणाले. आई वडिलांच्या कार्यकर्तुत्वाचा आलेख सांगणाऱ्या वेगवेगळ्या कविता आणि त्यांचे कृतज्ञता नमूद करणारे अनेक गीत व काव्य काकडे यांनी यावेळी उपस्थितां समोर मांडले. बहिणाबाईंच्या कवितेतून त्यांनी आई, वडील व बहिणी विषयी मांडलेल्या कवितांनी उपस्थितांचे डोळे पाणावले.

आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये बोलताना गुजरातचे जीएसटी आयुक्त शिवाजीराव डांगे यांनी विचार व्यक्त केले की, बळीराजा ही संकल्पनाच अशी होती की, अगदी वैदिक संस्कृतीच्या आधी तसेच रामायण महाभारताच्या पुर्वी असलेल्या संस्कृतीमध्ये बळीला स्थान होतं. कृषक समाजाचा राजा म्हणजे बळीराजा होय. आयोजित कार्यक्रमाच्या संदर्भात बोलताना डांगे म्हणाले की, अण्णांनी अतिशय स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. वडाळी गावच्या माता भगिनीं ज्या वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. त्या आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्रित आल्या. व्याख्याते सिताराम काकडे यांच्या व्याख्यानातील आई-वडिलांविषयीचा संदर्भ देत आई वडिलांविषयी कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली. दोन महिन्यापूर्वी आईचे छत्र हरपलं मात्र, ही पोकळी कमी करण्याचे काम बऱ्याच प्रमाणात आपलं गाव आपली मातृभूमी करते असे विचार यावेळेस त्यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे आयोजक घन:श्याम शेलार यांनी आभार व्यक्त केले. यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी नमूद केले की, सर्वत्र पुण्यस्मरणाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होत आहेत. मात्र, माणूस हयात असताना केलेला त्यांचा गुणगौरव हा त्यांना वेगळाच आनंद देणारा असतो. आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आयुष्याच्या शेवटपर्यंत राहतो व ते आशीर्वाद देतात. पुढें बोलतांना म्हणाले की, प्रतिकूल परिस्थितीत साधारण ३०-३५ वर्ष राजकारणात टिकणे अवघड गोष्ट आहे. मात्र, तालुक्यातील जनतेच्या आशीर्वादामुळे आणि पाठबळामुळे मी आजपर्यंत राजकारणात आहे. यश अपयशाची परवा न करता प्रत्येकाला सकारात्मक दृष्टीने सहकार्य केले आहे. असेही ते म्हणाले. आयोजित केलेल्या भाऊबीज कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्रित आलेल्या गावातील सर्व मुलींना त्यांच्या मैत्रिणींना संबंधितांना या निमित्ताने भेटता आले याचा मोठा आनंद होत असलेले त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक पाटील भोसले यांनी केले. तर, सूत्रसंचालन बापू गायकवाड यांनी केले.

कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे दीपकराजे शिर्के, भाऊसाहेब इथापे, एडवोकेट विठ्ठल काकडे, अंबादास गारुडकर, बाळासाहेब शेलार, माऊली दळवी, हभप सयाजी महाराज, रानीताई झेंडे, गोविंद जठार, निर्मला ताई नागवडे, सौ, घोलप ताई, लोटके सर, मोहन भिंताडे, सरपंच सौ, सकट ताई, मिनल ताई भिंताडे, मुकुंद सोनटक्के, प्रकाश निंभोरे, संजय आनंदकर, भाऊसाहेब शिंदे सह वडाळी, सुरुडी गावातील माता, भगिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ---आप्पा चव्हाण

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.