गिरगावमधील भीषण आगीत सहा कारसह आठ दुचाकी जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
By : Polticalface Team ,Thu Oct 27 2022 09:11:50 GMT+0530 (India Standard Time)
मुंबई : गिरगाव येथील एका वृत्तपत्राच्या कार्यालयाला लागूनच असलेल्या पुंगालिया हाऊस कंपाऊंडमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली. मध्य रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. या आगीत पाच ते सहा कारबरोबर आठ ते दहा दुचाकी जळून खाक झाल्यात. तर या कंपाउंडमध्ये ठेवलेले लाखो रुपयांचे कपडे, प्लास्टिक आणि नायलॉनचे रोल जळून खाक झालेत. तसेच बाजूच्या दोन घरांनाही आग लागली आहे. फटाक्यानं ही आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मध्यरात्रीच्या सुमारास पुंगालिया हाऊस कंपाऊंडमध्ये ही आग लागली. आग इतकी भीषण होती की, पाच ते सहा कारबरोबर आठ ते दहा दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. तसेच तिथे राहणाऱ्या लोकांचं मोठं नुकसान झालं आहे. फटाक्यांमुळेच ही आग लागल्याची दाट शक्यता आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. स्थानिक नागरिक, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी अनेक गाड्या बाहेर काढण्यात यश मिळवलं. सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमाक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. जीवितहानी झाली नसली तरी नागरिकांचे कोट्यवधी रुपयांचं नुकसान आगीमुळं झालंय
वाचक क्रमांक :