श्री.संत शेख महंमद महाराज मंदिर बारवेवर दीपोत्सव; महाराष्ट्र बारव मोहिम अंतर्गत शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनचा उपक्रम..!

By : Polticalface Team ,

श्री.संत शेख महंमद महाराज मंदिर बारवेवर दीपोत्सव; महाराष्ट्र बारव मोहिम अंतर्गत शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनचा उपक्रम..! श्रीगोंदा प्रतिनिधी श्रीगोंदा नगरीचा इतिहास मोठा गौरवशाली आहे.दक्षिण काशी म्हणून ओळख आहे. पंढरीच्या पांडुरंगाशी थेट नाते सांगणारी ही पवित्रभूमी. भारतातील पवित्र सरस्वती नदीचा सहवास इथे श्रीगोंदेकरांना लाभला आहे.प्राचिन राजमार्गाच्या पाऊलखुणा आजही दिमाखात उभ्या आहेत. बारव या त्यापैकीच पाऊलखुणा आहेत. पुर्वीच्या काळी श्रीगोंदयामध्ये जलव्यवस्थापन अप्रतिम होते. श्रीगोंदे तालुक्यात १०० च्या वर बारवा, दगडी पायविहिरी अस्तित्वात होत्या. त्यातील एक‌ अप्रतीम तीन मजली बारव. श्री.संत शेख महंमद महाराज मंदिर श्रीगोंदा. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांनी श्री संत शेख महंमद महाराज यांच्या नित्य वापरासाठी ही बारव १५९६ साली बांधून घेतली आहे.४०६ वर्षापुर्वीची बारव.

श्रीगोंदे तालुक्यातील या सर्व बारवा आपल्या पूर्वजांचे वैभव, परंपरा संस्कृती आणि वारसा सांगत आहेत. इथे इतिहास घडला आहे. शेकडो वर्षांपासून अनेकांची तहान या बारवांनी शमविली आहे. जीवंत पाण्याचा स्रोत असलेल्या या बारवा आहेत.या बारवांचे जतन करण्यासाठी स्वच्छता करून पूर्वीप्रमाणे संवर्धन करण्याचा प्रयत्न रोहन काळे यांचे साथीने "महाराष्ट्र बारव मोहिम" अंतर्गत शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन परिवार करत आहे.

महाराष्ट्रातील हिंदू-मुस्लिम एकोपा जपणारी महान विभुती श्री.संत शेख महंमद महाराज मंदिर परिसरातील तीन मजली बारव दिवाळी पाडव्याला १४०६ दिव्यांनी उजळुन निघाली. आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेला युगायुगांचा अलौकिक वारसा मातीच्या दिव्यांनी उजळुन निघाला.

श्रीगोंदा तालुका पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर, यांचे हस्ते दीपप्रज्वलन व बारव पाण्याचे जलपूजन करण्यात आले. शेख महंमद महाराजांचे वंशज पत्रकार अमीन शेख, राजु शेख, यात्रा कमिटी अध्यक्ष गोपाळराव मोटे पाटिल.शिवदुर्गचे अध्यक्ष राजेश इंगळे,उपाध्यक्ष, डॉ. चन्द्रशेखर कळमकर, सचिव, सोमेश शिंदे ,संपर्कप्रमुख, महीला रणरागिणी, बालमावळे,यांचेसह शिवदूर्ग परिवाराचे ५० स्वयंसेवक मावळे उपस्थित होते.शेकडो श्रीगोंदेकरांनी उपस्थित राहून हा नयनरम्य सोहळा अनुभवला.

शिवदुर्गच्या वतीने २५ वा बारव दिपोत्सव! नजरेआड गेलेला वारसा पुन्हा नव्याने उजेडात यावा म्हणून शिवदुर्ग परिवार बाराव दिपोत्सव साजरा करत आहे. श्रीगोंद्यातील सर्व बारवा टप्प्याटप्प्याने शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन परिवार तरुणाईला सोबत घेवुन लोकसहभागातून संवर्धित करणार आहे.आपला ऐतिहासिक वारसा आपण जतन करूया असे उदगार शिवदुर्ग संचालक संकेत नलगे यांनी व्यक्त केले. दीपोत्सवची रांगोळी प्रतीभा इथापे, कपिल उल्हारे यांनी काढली.

मारूती वागसकर यांनी स्वागत व सूत्रसंचालन केले. उपस्थितांचे आभार संचालिका संगीता इंगळे यांनी व्यक्त केले. यावेळी स्वयंसेवक म्हणून शिवदुर्गच्या पुरुष व महिला रणरागिणी यांनी आपले योगदान दिले. पत्रकार गणेश कविटकर, सुहास कुलकर्णी, नितीन शेळके, संकेत लगड, रोहिणी शेळके, अक्षीका इंगळे, नितीन घालमे, नीरज पाडळे, अजित लांडगे, मिठू लंके, अमोल बडे, गोरख कडूस, हेमंत काकडे, मारूती साळवे, सुषमा साळवे, भूषण काकडे, मनेश जठार,यांसह अनेक नागरिक उपस्थीत होते. ----आप्पा चव्हाण

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.

शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा

श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.

श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका

श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार

विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे

सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता

श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद