टायगर ग्रुप चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉक्टर पैलवान तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन

By : Polticalface Team ,

टायगर ग्रुप चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉक्टर पैलवान तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करमाळा प्रतिनिधी टायगर ग्रुप चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तसेच समाजसेवक माननीय श्री डॉक्टर पैलवान तानाजी भाऊ जाधव यांच्या येत्या दोन नोव्हेंबर रोजी होत असलेल्या वाढदिवसानिमित्त टायगर ग्रुप करमाळा शहर तालुक्याच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहे

टायगर ग्रुप चे प्रांतिक आध्यक्ष पैलवान तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त टायगर ग्रुप च्या वतीने भव्य रक्तदान शिबिर, मोफत नेत्र तपासणी शिबिर, मोफत मुळव्याध निदान व उपचार शिबिर, तसेच कबड्डी स्पर्धा याशिवाय वृक्षारोपण, तसेच उपजिल्हा रुग्णालय करमाळा येथे रुग्णांना फळे वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे

भाऊंच्या वाढदिवसानिमित्त 28 ऑक्टोबर २०२२ रोजी येथील दत्त मंदिरामध्ये भव्य रक्तदान शिबिर तसेच मोफत नेत्र तपासणी शिबिर सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत ठेवण्यात आलेले आहे सदर शिबिराचे उद्घाटन माननीय पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांच्या हस्ते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसीलदार समीर माने याशिवाय प्रमुख अतिथी म्हणून पोलीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर विशाल हिरे याशिवाय सावंत गटाचे युवा नेते सुनील सावंत, मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल, माजी नगराध्यक्ष वैभव राजे जगताप, विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, कन्हैयालाल देवी, एडवोकेट कमलाकर वीर, युवा नेते पृथ्वीराज पाटील, भैरवनाथ शुगरचे चेअरमन किरण सावंत, बाळासाहेबांची शिवसेना चे तालुकाप्रमुख सुधाकर काका लावंड, संतोष वारे, भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख महेश दादा चिवटे, नगरसेवक श्री निवास कांबळे, प्रशांत डहाळे, अतुल फंड, महादेव फंड ,अल्ताफ तांबोळी, शौकत नालबंद प्रवीण जाधव, सचिन घोलप, नवनाथ राखुंडे, दशरथ कांबळे, नागेश कांबळे, भरत अवताडे, जगदीश अग्रवाल, देवानंद बागल, प्रवीण कटारिया, संजय घोलप, सचिन गायकवाड, सोमनाथ चिवटे, विनय ननवरे, अमोल यादव, आदी मान्यवर सदरच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून लाभणार आहे तसेच पत्रकार बांधव देखील उपस्थित राहणार

याशिवाय दिनांक 30 ऑक्टोबर 2022 रविवार रोजी मोफत मुळव्याध निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर प्रदीप तुपेरे हे उपस्थित राहणार असून कार्यक्रमाचे उद्घाटक आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन माननीय डॉक्टर प्रदीप आबा जाधव पाटील हे राहणार असून करमाळा शहरातील नामवंत डॉक्टर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे सदरचा मोफत मुळव्याध निदान व उपचार शिबिर हे करमाळा शहरातील जाधव पाटील हॉस्पिटल अर्बन बँके शेजारी या ठिकाणी सदरचे शिबिर सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत ठेवण्यात आलेले आहे सदर गरजू रुग्णांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन टायगर ग्रुपने केले आहे याशिवाय एक नोव्हेंबर मंगळवार भव्य कबड्डी स्पर्धा चे आयोजन जीन मैदान करमाळा या ठिकाणी सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत ठेवण्यात आलेले आहे सदर कबड्डी स्पर्धाचे उद्घाटन सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदाळे यांच्या हस्ते ठेवण्यात आलेले असून सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक श्री संभाजी किरदक व श्री सुनील जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सदर कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे सदर कबड्डी स्पर्धेमध्ये प्रथम बक्षीस /७७७७/- रुपये श्री भारत भाऊ अवताडे उद्योजक यांच्या वतीने तर द्वितीय बक्षीस ५५५५/- रुपये मनसेचे शहर प्रमुख श्री नानासाहेब मोरे यांच्यातर्फे तर तृतीय बक्षीस ३३३३/- उद्योजक श्री विनोद महानोर यांच्या वतीने ठेवण्यात आलेले आहे याशिवाय बुधवार दोन नोव्हेंबर 2022 बुधवारी रोजी जिन मैदान येथे कबड्डी स्पर्धेतील विजेत्या करिता बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सायंकाळी सात वाजता ठेवण्यात आलेला आहे

याशिवाय दोन नोव्हेंबर बुधवार रोजी सकाळी 11 वाजता टायगर ग्रुप ऑफिस समोर भव्य वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले आहे सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक प्रदीप मोहिते सर तर कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय सौ अश्विनी किरगत आगार व्यवस्थापिका करमाळा हे उपस्थित राहणार आहे सदर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून करमाळा नगरपालिकेचे मुख्याधिकारी बालाजी लोंढे नगरसेवक श्रेणिक खातेर हे उपस्थित राहणार आहे याशिवाय याच दिवशी दुपारी बारा वाजता करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये रुग्णकरिता मोफत फळे वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला आहे सदर कार्यक्रमाचे उद्घाटक उद्योजक बाळासाहेब कांबळे कार्यक्रमाचे अध्यक्ष गजानन गुंजकर वैद्यकीय अधीक्षक याशिवाय प्रमुख उपस्थिती म्हणून बाळकृष्ण कांबळे प्रवीण शिंदे लक्ष्मण भोसले हे उपस्थित राहणार आहे

तरी उपयुक्त सर्व सामाजिक उपक्रमाचा करमाळा शहर व तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा तसेच रक्तदान शिबिरामध्ये देखील नागरिकांनी उस्फूर्तपणे सहभाग दाखवून रक्तदान करावे असे आवाहन टायगर ग्रुप च्या वतीने करण्यात आली आहे

याशिवाय टायगर ग्रुप चे प्रांतिक अध्यक्ष पैलवान डॉक्टर तानाजी भाऊ जाधव यांचा दिनांक 2 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता जिन मैदान येथे भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे सदर सत्कार सोहळ्याला राज्य तसेच परराज्यातील अनेक टायगर ग्रुप चे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे सदर चा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी टायगर ग्रुप चे सर्व सदस्य अहोरात्र परिश्रम घेत आहेत

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.

शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा

श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.

श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका

श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार

विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे

सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता

श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद