By : Polticalface Team ,Sat Oct 29 2022 13:46:52 GMT+0530 (India Standard Time)
माझ्या मतदारसंघात येऊ नका म्हणून आमदार रोहित पवार यांनी तानाजी सावंत यांनी दहा फोन केले, असं राम शिंदे म्हणाले होते. यावर प्रत्युत्तर देताना रोहित पवार म्हणाले की, ज्याला पैसा आणि अहंकाराची खाज आहे, ज्याला हाफकीन संस्था आहे की व्यक्ती हेही माहिती नाही. जो महाराष्ट्राला भिकारी बनवण्याची भाषा करतो, अशा व्यक्तीला मतदारसंघात न येण्यासाठी मी कशाला मस्का लावू? असं म्हणत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर सडकून टीका केली.
तसेच रोहित पवारांनी राम शिंदेंवरही निशाणा साधला. राम शिंदे साहेब पुड्या सोडू नका. खेकड्याची चाल लोकं स्विकारत नाहीत. हिंमत असेल तर याचा पुरावा द्या आणि यापुढं तुमच्याच प्रचाराला त्यांना जरूर बोलवा. मग मैदानात बघू! असं आव्हान रोहित पवारांनी राम शिंदे यांना दिलं आहे.
दरम्यान, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनीही याआधी रोहित पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली होती. तर आता रोहित पवारांनी ही आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर टीका केली आहे. तसेच राम शिंदेंना देखील आव्हान दिलं असून आता यावर राम शिंदे काय बोलणार? हे पाहणं महत्वाच असणार आहे वाचक क्रमांक :