व्यंकनाथ विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांची स्नेह मेळाव्यानिमित्त गळाभेट

By : Polticalface Team ,Mon Oct 31 2022 07:29:09 GMT+0530 (India Standard Time)

व्यंकनाथ विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांची स्नेह मेळाव्यानिमित्त गळाभेट
लिंपणगाव (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील एक आदर्श विद्यालय समजले जाणारे लोणी व्यंकनाथ येथील विद्यालयाच्या 1997 एस एस सी च्या माजी विद्यार्थ्यांनी पंचवीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर रौप्यमहोत्सवी स्नेह स्नेह मेळावा घेत त्याकाळचे आपल्या गुरु शिष्यांची गळा भेट घेत एक आगळावेगळा कार्यक्रमानिमित्त विचार मंथन केले. मनातले ओझे कमी करण्याचे हक्काचा एकच ठिकाण मैत्री हे ब्रीदवाक्य समोर ठेवत पुस्तकी ज्ञानापेक्षा संस्काराचे ज्ञान पवित्र मानत त्या काळी शिक्षकांनी आपल्यावर संस्काराचे शिक्षण देऊन आमच्या जीवनाला आनंदी व सुंदर आकार दिला. माध्यमिक शिक्षणापर्यंत आई-वडिलांना प्रमाणे गुरूंचे जीवनाला खूप काही प्रेम व दिशा मिळाली. त्या गुरुजनांचे ऋण व्यक्त करत विद्यार्थी दशेतील 1997 च्या एस एस सी बॅचच्या विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उपस्थित सर्वच माजी विद्यार्थ्यांनी उजाळा दिला. याप्रसंगी या बॅचचे अनेक विद्यार्थी शासकीय सेवेसह विविध क्षेत्रात उच्चपदस्थ अधिकारी मोठे व्यावसायिक इंजिनीयर डॉक्टर अशा विविध क्षेत्रात यशस्वीरित्या वाटचाल करत असल्याचे पाहून उपस्थित शिक्षक देखील भारावून गेले. सदरचा स्नेह मेळावा आयोजित करण्यासाठी माजी विद्यार्थी आपासाहेब खराडे व प्रकाश काकडे यांनी हा मेळावा घडवून आणत यशस्वी केला. स्नेही मेळाव्यानिमित्त या माजी विद्यार्थ्यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला तसेच विद्यालयाला भेट म्हणून प्रत्येक वर्गात लाईट फिटिंग सह 19 सिलिंग फॅन हाय मॅक्स मरकुरी दिवे अशाप्रकारेा 51 हजाराची मदत या विद्यालयाल सप्रेम भेट दिली. या स्नेही मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक आर के लगड हे होते. याप्रसंगी माजी विद्यार्थी महेंद्र साळवे यांनी उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी माध्यमिक शिक्षणानंतर घेतलेली गरुड झेप याविषयी प्रत्येक विद्यार्थ्यांशी संवाद साधत जुन्या आठवणींना उजाळा देत हास्याची किनार देऊन ओळख परेड करून दिली. यावेळी भावनिक वातावरण निर्माण झाले.

याप्रसंगी माजी विद्यार्थी बाजीराव कोळपे यांनी आपल्या भावना व्यक्त करत एकत्रित मेळाव्यामुळे आम्हाला आमचे शालेय जीवनातील जुने विद्यार्थी मित्र पंचवीस वर्षानंतर भेटले मनस्वी आनंद झाला त्यानिमित्त शिक्षकांचे देखील दर्शन लाभल्याबद्दल धन्य वाटल्याचे सांगितले.

माजी विद्यार्थी उद्योजक बंडोपंत जगताप यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, मला या विद्यालयातून माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर उद्योजक होण्याची प्रेरणा मिळाली. वसुंधरा बचाव अभियानांतर्गत मॉल उभा करून एक वर्षात प्रगतीपथावर घेऊन जाणे ही सोपी गोष्ट नाही. याबरोबरच मी पेंटर ते कंट्रक्शन असा प्रवास करून उद्योजक होण्यापर्यंत ध्येय घाटले. मैत्रीची ऊर्जा ही सोने आहे. त्यामध्ये सुसंगत विद्यार्थी मित्र व गुरु मिळाले म्हणूनच आपण या क्षेत्रात यशस्वी झाल्याचे जगताप यांनी सांगितले.

मेळाव्यानिमित्त मुख्याध्यापक बाळासाहेब जठार आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, आजचा दिवस हा दुग्धशर्करा दिवस व सुवर्ण दिवस म्हणावा लागेल. 25 वर्षाची 1997 ची एस एस सी ची बॅच एकत्र येत स्नेह मेळावा घेऊन सर्वांनी हितगुज करून शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. निश्चितच समाधान वाटले. शिक्षणाचा मुख्य पाया हा पर्यटन आहे. जगाची माहिती घेतली पाहिजे, जीवनामध्ये आनंदी जीवन जगण्यासाठी ही मैत्री प्रेरणादायी आहे. निश्चितच या मैत्री ग्रुप मुळे गावाचा देखील विकासाच्या दृष्टिकोनातून कायापालट होऊ शकतो. म्हणून गावात मंदिरापेक्षा ज्ञानमंदिर महत्त्वाचे आहे. आम्ही दिलेल्या संस्काराचे उत्तम प्रकारे रुजवणूक झाली असे सांगितले.

प्रसंगी या विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्तात्रय सस्ते ,सेवानिवृत्त शिक्षक रोहिदास दिवटे, बाळासाहेब शेंडे, खेडकर सर, शिवाजी इथापे ,आदिनाथ पाचपुते, आनंदा पुराणे संदीप दळवी सर, हनुमंत जगताप आदींनी शिक्षणामुळे जीवनाला कशी दिशा मिळते याविषयी भरीव मार्गदर्शन केले.

अध्यक्ष स्थानावरून मार्गदर्शन करताना माजी मुख्याध्यापक आर के लगड यावेळी म्हणाले की, माजी विद्यार्थ्यांनी झोकून घेऊन काम केल्याने विविध क्षेत्रात संधीचे सोने केले. त्याचे आत्मिक समाधान मिळाले. हा मेळावा आनंददायी नव्हे तर प्रेरणादायी आहे. पुढे जीवन जगत असताना प्रत्येकाने व्यसनमुक्त संकल्प करावा, शरीर सांभाळावे, आई वडील गुरूंची आज्ञा पाळावी, त्याकाळी प्रतिकूल परिस्थितीत विद्यालय उभारण्यात आपण मोठे योगदान देऊन संस्कारक्षम विद्यार्थी घडविले. गरुड झेप घेत उच्चपदस्थ व काही उद्योजक बनले याचे मनस्वी आत्मिक समाधान मिळाल्याचे सांगितले. यावेळी फोटोग्राफर प्रशांत पांडव, कला शिक्षक अभिषेक उदमले, सागर खंडागळे, पत्रकार नंदकुमार कुरुमकर, पोपट राऊत, एकनाथ नेटवटे, आदी उपस्थित होते.

विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय सस्ते यावेळी म्हणाले की माजी विद्यार्थ्यांनी कौटुंबिक जिव्हाळा म्हणून जिथे ज्ञानाचे धडे मिळाले त्या मातृभूमीला न विसरता एक बंधुत्वाची भावना ठेवून विद्यालयात स्नेह मेळावा आयोजित केल्याबद्दल ऋण व्यक्त करत आभार मानले.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.