भांडगाव येथे आमदार राहुल कुल यांचा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा, तर एका गटात नाराजी
By : Polticalface Team ,Mon Oct 31 2022 07:32:12 GMT+0530 (India Standard Time)
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता २९ ऑक्टोबर २०२२, रोजी भांडगाव येथे आमदार अँड राहुल दादा कुल यांच्या वाढदिवसानिमित्त दि,२९ ऑक्टोबर रोजी भांडगाव ग्रामपंचायत व लोकमान्य हॉलिस्टिक कॅन्सर केअर अँड रिसर्च सेंटर चिंचवड पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत महाआरोग्य शिबिर व शेतकरी मेळाव्याचे आयोजित करण्यात आले होते, या शिबिराचे उद्घाटन विद्यमान सरपंच संतोष आबा मधुकर दोरगे, उपसरपंच सौ सिंधुताई शंकर हरपळे, यांच्या हस्ते करण्यात आले, या प्रसंगी भांडगाव ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मणदादा बबन काटकर, प्रमोद रामचंद्र दोरगे तुषार राजू शेंडगे सदाशिव कुंडलिक दोरगे, रूपालीताई राहुल खळतकर नीलमताई संदीप दोरगे, शितलताई विजय दोरगे, नंदाताई नवनाथ जाधव, सुनंदाताई सदाशिव गायकवाड, राजेंद्र श्रीरंग कदम ग्रामविकास अधिकारी, प्रामुख्याने उपस्थित होते, दौंड तालुक्याचे विद्यमान आमदार राहुल दादा कुल यांच्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांच्या हस्ते जाहिर सत्कार करण्यात आला, या वेळी आमदार राहुल कुल, बोलताना म्हणाले भांडगाव ग्रामपंचायत विद्यमान सरपंच व उपसरपंच आणि सर्व सदस्य गाव विकासाच्या मुद्यावर एकत्रित आल्याने गाव गाड्यातील विकास कामाला गती मिळेल, दौंड तालुक्यातील राजकारण व तालुक्यातील विकासासाठी आवश्यक असलेल्या अनेक मुद्द्यावर ते बोलत होते, राजकीय क्षेत्रातील पदअधिकारी व कार्यकर्ते ग्रामस्थांना मोलाचा संल्ला दिला, कधीतरी इतरांच्यासाठी का होईना थांबाण्याची वेळ आली तर थांबावे, असं म्हणत, बँकेच्या निवडणुकीत मी निवडुन आलो असतो, मात्र भारतीय जनता पक्षाच्या आदेशाने मी ही माघार घेतली होती त्यामुळे दौंड तालुक्यात विविध प्रश्नां संदर्भात केंद्र व राज्य सरकारचे सहकार्य लाभत आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त करत भांठगावच्या नवनिर्वाचित युवा तरुण कार्यकर्त्यांना सल्ला दिला आहे, दौंड तालुक्यातील विविध विकास कामे झपाट्याने व गतीने पुढे चालली असून, महत्त्वाच्या विकास कामांची तत्काळ दखल घेऊन उर्वरित कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले, भांडगाव ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी धिर धरुन थांबण्याचा सल्ला दिला आहे, पुढील काळात दौंड च्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत मिळत असल्याची चर्चा होत आहे, भांडगाव ग्रामपंचायत विकास कामात गतीने पुढे जाईल असे आश्वासन त्यांनी दिले आहे,
भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठांच्या आदेशानुसार लोकसभेची निवडणुक लढवण्याचा निर्णय घेतला होता, परंतु मी कोणत्याही मंत्री पदाची अपेक्षा न बाळगता, राज्याचे उपमुख्य मंत्री मा देवेंद्रजी फडणवीस यांच्या कडे पाणी प्रश्नावर चर्चा करून पुढील काळात शेतीसाठी व पाणी पुरवठा योजनेच्या संदर्भात दौंड तालुका व भांडगाव ग्रामपंचायत माटोबा तलाव पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले,
दौड तालुक्यातील भिमा पाटस साखर कारखाना काही दिवसात सुरू होत असून सभासदांनी कारखान्याला ऊस घालावा असे कुल यांनी सांगितले आहे
भांडगाव ग्रामपंचायत सदस्य संख्या पाहता राज्यातील परस्तीनुसार एक प्रकारे भांडगाव मध्ये (शिंदे गट) निर्माण झाला असल्याची चर्चा होत आहे, त्यामध्ये प्रामुख्याने युवा तरुण कार्यकर्ते गटाच्या पाच सदस्यांची व युवा कार्यकर्त्यांची नाराजी दिसून येत आहे, मात्र राहुल दादा कुल अभिष्टचिंतन सोहळ्याच्या कार्यक्रमात भांडगाव च्या एका नाराज गटाने उशिरा उपस्थिती दर्शवली असल्याने ग्रामस्थांच्यात चर्चेला उदान आले होते, या प्रसंगी भांडगाव ग्रामपंचायत सदस्य सदाशिव कुंडलिक दोरगे सौ शितल विजय दोरगे सौ नीलम संदीप दोरगे, प्रमोद रामचंद्र दोरगे, श्याम यशवंत कापरे, हैदर शेख, रवींद्र विठ्ठल जाधव, महेंद्र दोरगे विजयराज दोरगे, बंटी दोरगे, दिलीप नारायण भोसले, सुरेश वामन दोरगे, अँड अजित दोरगे, सुरेश वामन दोरगे, बाळासाहेब आखाडे, नंदकुमार दोरगे सुभाष आखाडे, राहुल बोरकर, संतोष कदम, दिलीप गायकवाड, दिलीप कदम, अंबादास पवार, राजेंद्र शेंडगे, हर्षल ढमाळ,सुरेंद्र जाधव, प्रदीप दोरगे, या युवा तरुण गटात नाराजी पसरली असल्याचे दिसून येत होते, या संबंधित काही लोक घरवापशी झाल्याने एकत्रित येऊन एकमेकांची नाराजीचा सूर व्यक्त केला जात होता, मात्र आमदार अँड राहुल दादा कुल यांच्या वाढदिवसा निमित्त भांडगाव येथील अभिष्टचिंतन सोहळा कार्यक्रमात हा नाराज असलेला गट सहभागी झाला होता, पुढील काळात भांडगाव ग्रामपंचायत कोणत्या दिशेने वाटचाल करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे,
दौंड तालुक्याचे विद्यमान लोकप्रिय आमदार अँड राहुल दादा कुल यांच्या दि ३० ऑक्टोबर वाढदिवसानिमित्ताने मोफत महाआरोग्य शिबिरामध्ये भांडगाव परीसरातील सर्व सामान्य शेतकऱ्यांचे व तरुण युवक पुरुष महिला जेष्ठ नागरिकांनी विविध आरोग्याची तपासणीसाठी, पाचशे ते सहाशे नागरिकांनी सहभाग नोंदवला,
शिबिरात आलेल्या सर्व नागरिकांचे विविध प्रकारच्या आरोग्यची तपासणी करुन डॉ यांनी योग्य मार्गदर्शन केले, यामध्ये जनरल तपासणी ब्लड प्रेशर, श्रीरोग तपासणी, हृदयरोग तपासणी, काम व डोळे तपासणी करून मोफत चष्मे देण्यात आले, तसेच पोस्ट विभागामार्फत अपघात संरक्षण विमा पॉलिसी, पाच वर्ष पर्यंतच्या लहान मुलांचे आधार कार्ड, आधार कार्डीला मोबाईल लिंक करणे, या विविध प्रकारच्या समस्यावर मागदर्शन करण्यात आले, या प्रसंगी आरोग्य शिबिरात भांडगाव पंचकृशितील नागरिकांचे लक्ष वेधले होते, नागरिकांनी मोठी गर्दी दर्शवली होती, या आरोग्य शिबिर कार्यक्रमात आलेल्या सर्व नागरिकांनी भोजनाचा आस्वाद घेतला, भांडगाव ग्रामपंचायत व मान्यवरांच्या उपस्थितीत आमदार राहुल दादा कुल यांचा वाढदिवसा निमित्त जाहीर सत्कार करण्यात आला, या प्रसंगी भांडगाव पंचक्रोशीतील नागरिकांनी व तरुण युवकांनी मोठी गर्दी दर्शवली होती,
भांडगाव पंचक्रोशीतील युवकांसाठी उद्योग संधी व शासकीय योजना संदर्भात मोलाचे मार्गदर्शन मा, नितीन बेंद्रे, प्रकल्प समन्वयक महाराष्ट्र उद्योजक्ता विकास केंद्र पुणे,यांनी युवा तरुण कार्यकर्ते यांना मार्गदर्शन केले,
दौंड तालुक्याचे विद्यमान आमदार अँड राहुल दादा कुल, यांच्या वाढदिवसा निमित्त, संध्याकाळी ह भ प ज्ञानेश्वर माऊली पठारे, कर्जत यांचे वारकरी संप्रदायातील उत्कृष्ट हरिनाम कीर्तन सेवेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, भांडगाव पंचक्रोशीतील ज्येष्ठ व सांप्रदायिक जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता, या कार्यक्रमाचे प्रस्तावित लक्ष्मण दोरगे यांनी केले, तर सूत्रसंचालन राहुल खळतकर यांनी केले,
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.