शरद पवारांची तब्येत बिघडली; ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
By : Polticalface Team ,Mon Oct 31 2022 15:17:09 GMT+0530 (India Standard Time)
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मुंबईमधील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यांची तब्येत ठीक नसल्यानं ते उपचार घेत असल्याचं राष्ट्रवादीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलंय. पुढचे तीन दिवस ते याच रुग्णालयात उपचार घेणार आहेत.
राष्ट्रवादीचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, शरद पवार यांची प्रकृती ठीक नसल्यामुळं डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, ब्रीच कँडी रुग्णालयात पुढील तीन दिवस उपचार घेणार आहेत. 2 नोव्हेंबरला सायंकाळी त्यांना डिस्चार्ज मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पवार यांचे पुढचे कार्यक्रम नियोजनाप्रमाणेच होतील, असंही निवेदनात म्हटलंय. 3 नोव्हेंबरला ते शिर्डी येथे येणार आहेत. त्यानंतर पवार राष्ट्रवादीच्या 4 आणि 5 नोव्हेंबरला होणाऱ्या दोन दिवसीय शिबिरासाठी उपस्थित राहून सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत. तरी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रुग्णालयाच्या आवारात गर्दी न करण्याचं आवाहनही या निवेदनाद्वारे करण्यात आलंय
वाचक क्रमांक :