उसाला 350 एफआरपी दरापेक्षा अधिकचा भाव मिळण्यासाठी स्वाभिमानीचा महामोर्चा
By : Polticalface Team ,Wed Nov 02 2022 09:48:51 GMT+0530 (India Standard Time)
जालना : साखरेला गतवर्षी बाजारात चांगला भाव मिळाला. इथेनॉलच्या माध्यमातूनही गतवर्षी चांगलं उत्पादन मिळालं. परंतु शेतकऱ्यांना चांगला उसदर दिला नाही. गतवर्षीच्या ऊसाला 200 तर यावर्षी तोडणीला येणाऱ्या उसाला 350 एफआरपी दरापेक्षा जास्त भाव मिळावा यासाठी 7 नोंब्हेबर रोजी साखर आयुक्त पुणे येथे महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाची सरकारने दखल न घेतल्यास संपूर्ण राज्यात 17 व 18 नोंब्हेबरला राज्यातील ऊसतोडणी बंद करून शेतकरी एकजुटीची ताकद दाखवणार असल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी वडीगोद्री येथे पहिल्या ऊस परिषदेत सांगितले.
या ऊस परिषदेत प्रा. जालिंदर पाटील, प्रा. शिवाजी हुसे, शिवाजी भोसले युवती प्रदेशाध्यक्ष पुजा मोरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साईनाथ चिन्नोदरे, सुरेश काळे, नामदेव खोसे, गणेश राजबिंडे, राजेंद्र खटके, विष्णू नाझरकर, गणेश गावडे, गोपाल खोमणे, तुकाराम गवळी यासह आदी पदाधिकारी उपास्थित होते. राजु शेट्टी म्हणाले की, राज्यात गुऱ्हाळ चालकांची रिकवरी 11 टक्के निघते. तिथे कारखानदारांची रिकवरी 6 ते 7 टक्के कसे निघते.
उलट गुऱ्हाळवाल्यांना उसापासून गुळ पडत नाही, त्यापेक्षा जास्त साखर निघते. तरीही रिकवरी कमी दाखवून व शेतकऱ्यांचे उसाचं वजन चोरण्याचं राज्यात प्रमाण जास्त असल्याचं सांगितलं. उसाचं वजन रिकव्हरी वाढण्यासाठी 15 नोंब्हेबरनंतर गाळप सुरू केल्यानंतर शेतकऱ्यांना मोठा फायदा होऊन गोपीनाथ मुंडे ऊसतोडणी महामंडळाला जर पैसे पाहिजे असेल तर त्यांना ऊसतोडणी महामंडळातून पैसे उपलब्ध करून देण्यात यावे.
महाराष्ट्रातील 200 साखर कारखाण्यात उसाचे वजन मारण्याचे प्रमाण कमी होत नसल्याचं सांगितलं. याची दखल घेऊन वजनमारीच्या विरोधात वजनमापन नियंत्रण केंद्रीय अधिकारी अतिरिक्त पोलीस महासंचालक भेट घेऊन सर्व कारखान्याचे वजन काटे ऑनलाईन करण्यात यावे. साखर आयुक्तांनी एक समिती गठण केल्याचेही यावेळी राजू शेट्टी यांनी सांगितले.
देश डिजिटल इंडिया झाला पण महाराष्ट्रात साखर कारखान्याचे वजन काटे अजूनही डिजिटल का होत नाही. साखर कारखाण्याची काटेमारीबद्दल प्रचंड संताप आहे. महाराष्ट्रातील सर्व साखर कारखान्याचे वजनकाटे हे साखर आयुक्तांच्या कार्यालयात एकाच ठिकाणी नियंत्रणात डिजिटल झाले तर काटेमारीला आळा बसेल असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी वडीगोद्री येथे पहिल्या ऊस परिषदेत बोलताना सांगितले
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.
शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा
श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.
श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका
श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर
वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार
विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे
सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता
श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न
अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात
दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील
महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.
दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.
सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन
अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद