By : Polticalface Team ,Wed Nov 02 2022 16:08:55 GMT+0530 (India Standard Time)
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कोण आहे ही गौतमी पाटिल गौतमी पाटील हि मूळची धुळ्याची आहे. २६ वर्षीय गौतमीचे शिक्षण दहावीपर्यंत झालं आहे. गौतमी सांगते की तिने लावणीचं किंवा नृत्याचं कोणतंही प्रशिक्षण घेतलेले नाही. इतर कलाकारांना बघून आपण लावणी शिकल्याचे गौतमी सांगते, मागील १० वर्षांपासून गौतमी या क्षेत्रात कार्यरत आहे.
गौतमी पाटीलच्या लावणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर तिच्या अंगप्रदर्शन करणाऱ्या साडीवरून अनेक लावणी कलाकार संतापल्या होत्या. लावणीची परंपरा धुळीत मिळवण्याचे काम या व्हायरल होणाऱ्या मुली करत आहेत असा सुर नेटकऱ्यांनीही धरला होता. खरंतर या एकूण प्रकरणानंतर गौतमी पाटीलने व्हिडीओ बनवून रीतसर माफी मागितली होती पण तिच्या या माफीनंतरही अजूनही तिचे अनेक अश्लील नृत्याचे व्हिडीओ अजूनही व्हायरल होत आहेत.
तर आता भर की काय गौतमीच्या लावणी कार्यक्रमात चेंगराचेंगरी होऊन एकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे वृत्त समोर येत आहे. त्यामुळे सभ्यता आणि लोककला म्हणून मान्यता असलेली लावणी मात्र बदनाम होत आहे वाचक क्रमांक :