By : Polticalface Team ,Wed Nov 02 2022 17:41:20 GMT+0530 (India Standard Time)
सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी यासंदर्भात माध्यमांना माहिती दिली. किरण लोहार यांच्यावर कारवाईसाठी शिक्षण उपसंचालक यांकडे प्रस्ताव पाठवण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली. सोलापूर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली होती. किरण लोहार यांच्यासोबत एका लिपिकाला पकडण्यात आले होते. 50 हजार रुपयांची लाच मागून तडजोडी अंती 25 हजार रुपये ठरले होते.
लाच प्रकरणात अटक झाल्यानंतर लोहार यांना दुसरा धक्का बसला आहे. लोहार यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असा प्रस्ताव शिक्षण खात्याकडे पाठवण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. दिलीप स्वामी यांनी किरण लोहार यांचा पदभार देखील काढून घेतला आहे. उपशिक्षणाधिकारी संजय जावीर यांच्याकडे पदभार देण्यात आला आहे वाचक क्रमांक :